SIP Calculator: जर तुमचं उद्दिष्ट पुढील ५ वर्षांत १० लाख रुपयांचा फंड उभा करण्याचं असेल, तर योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत 'सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' म्हणजेच एसआयपी (SIP) हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. मात्र, ठराविक वेळेत १० लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा किती रक्कम गुंतवावी लागेल? परताव्याचा संभाव्य दर, गुंतवणुकीचा कालावधी आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन एसआयपी कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून हे सहज समजून घेता येतं.
एसआयपी म्हणजे काय?
एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हा गुंतवणुकीचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारम्युच्युअल फंडात ठराविक अंतरानं एक निश्चित रक्कम गुंतवतात. ही अशी पद्धत आहे जी लोकांना दरमहा, त्रैमासिक किंवा निश्चित कालावधीत लहान रक्कम गुंतवण्याची सुविधा देते, जेणेकरून ते दीर्घकाळात हळूहळू संपत्ती निर्माण करू शकतील. एसआयपीचा उद्देश गुंतवणूक सोपी, व्यवस्थित आणि सर्वांसाठी सुलभ बनवणं हा आहे, जेणेकरून बाजारातील चढ-उतार असूनही गुंतवणूकदार नियमितपणे पैसे साठवू शकतील.
मजबूत सुरुवातीनंतर शेअर बाजार फ्लॅट; Nifty २५,५०० च्या जवळ; IT-PSU Stocks मध्ये जोरदार खरेदी
एसआयपी गुंतवणुकीवरील परतावा
म्युच्युअल फंड हे बाजाराशी संबंधित असल्यानं एसआयपीमधील परताव्याला कोणतीही मर्यादा नसते. एसआयपीमध्ये नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यामुळे चक्रवाढ व्याज आणि 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग'चा फायदा मिळतो. सामान्यतः, इक्विटी-ओरिएंटेड एसआयपीनं सरासरी वार्षिक १२% परतावा दिला आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या फंडांनी तर दीर्घकाळात १५-१८% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आपण सरासरी १२ टक्के परताव्याच्या आधारे कॅल्क्युलेशन करून हा परतावा सहज समजू शकतो.
१० लाखांसाठी किती रुपयांची एसआयपी करावी?
एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर १२ टक्के परतावा धरला तर त्या आधारे हिशोब केल्यास असं दिसून येतं की, पुढील ५ वर्षांत १० लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला आजपासून १२,२०० रुपयांची एसआयपी करावी लागेल. पाचव्या वर्षी तुमच्याकडे एकूण १०,०६,३३४ रुपये जमा असतील. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ७,३२,००० रुपये असेल, ज्यावर तुम्हाला २,७४,३३४ रुपये परतावा म्हणून मिळतील. जर आपण १५ टक्के परताव्याच्या आधारे हिशोब केला, तर दरमहा ११,२०० रुपयांची एसआयपी करावी लागेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीची असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Want ₹10 lakh in 5 years? SIP is a great option. Investing ₹12,200 monthly with 12% returns can achieve this. Consider consulting a financial advisor before investing.
Web Summary : 5 साल में ₹10 लाख चाहिए? SIP एक अच्छा विकल्प है. 12% रिटर्न के साथ ₹12,200 मासिक निवेश करने से यह लक्ष्य प्राप्त हो सकता है. निवेश से पहले वित्तीय सलाहकार से सलाह लें.