SIP Power : कोट्याधीश होण्यासाठी खूप पैसे कमवावे लागतात. त्यामुळे महिन्याला २० ते ३० हजार रुपये कमावणारा व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, असेच तुम्हालाही वाटत असेल ना? चला आज तुमचा गैरसमज दूर करुयात. तुम्ही किती पैसे कमावता यापेक्षा तुम्ही त्याची कशी आणि कुठे गुंतवणूक करता याला फार महत्त्व आहे. जर तुम्ही दरमहा केवळ १० हजार रुपये गुंतवू शकत असाल तर सहजरित्या ७ कोटी रुपयांचा फंड जमा करू शकता.
गुंतवणुकीसाठी एसआयपीची जादूजर तुम्ही दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी म्युच्युअल फंडामध्ये केली. तर पुढील १० वर्षात तुमची गुंतवणूक १२ लाख रुपये होईल. या गुंतवणुकीवर सरासरी १२% परतावा गृहीत धरला तर एकूण २३,२३,३९१ रुपये मिळतील. आणि १५% वार्षिक व्याजानुसार एकूण २७,८६,५७३ रुपये मिळतील. पण गुंतवणुकीचा वेळ वाढतो, तशी चक्रवाढ व्याजारी जादू पाहायला मिळते. ही गुंतवणूक पुढील २० वर्षांसाठी कायम ठेवली तर १२% रिटर्नवर तुम्ही कोट्याधीश व्हाल. तुम्हाला एकूण ९९,९१,४७९ (सुमारे १ कोटी रुपये) मिळतील. जर परतावा १५ टक्के असेल तर तुम्हाला २० वर्षांत १,५१,५९,५५० रुपये मिळतील. २० वर्षात तुमची मूळ गुंतवणूक २४ लाख रुपये असेल.
३० वर्षांत किती कोटींचा फंड जमा होईल?जर तुम्ही सतत ३० वर्षे दरमहा १०,००० रुपये एसआयपीद्वारे गुंतवले. तर सरासरी १२ टक्के वार्षिक व्याजाने तुम्हाला एकूण ३,५२,९९,१३८ (३.५ कोटी) मिळतील. तर १५ टक्के दराने तुमच्या दरमहा १० हजार रुपयांचे ३० वर्षात एकूण ७,००,९८,२०६ रुपये (७ कोटी रुपये) मिळतील. म्हणजेच तुमच्या निवृत्तीसाठी तुमच्याकडे ७ कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल.
तुम्ही दररोज १० रुपये वाचवूनही होऊ शकता कोट्याधीशतुम्ही दररोज १० रुपये वाचवले तर तुम्ही एका महिन्यात ३०० रुपये जमा करू शकता. ४० वर्षे सतत गुंतवणूक करून तुम्ही सुमारे ९४,२१,१२७ रुपये (सुमारे एक कोटी) जमा करू शकता. या कालावधीत तुम्हाला फक्त १,४४,००० रुपये जमा करावे लागतील. १५ टक्के वार्षिक परताव्याच्या आधारे हा अंदाज लावला आहे.