Lumpsum Investment :म्युच्युअल फंडातगुंतवणूक करणे हा केवळ श्रीमंतांचाच अधिकार आहे, हा समज आता इतिहासजमा झाला आहे. मध्यमवर्गीय आणि सामान्य उत्पन्न गटातील लोकांसाठी श्रीमंत होण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. सध्याच्या बाजारपेठेत शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास 'कंपाउंडिंग'च्या (चक्रवाढ व्याज) जोरावर एक छोटीशी रक्कम देखील भविष्यात करोडोंचा निधी उभा करू शकते.
५० लाखांचा टप्पा कसा गाठाल?जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज एखाद्या चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली आणि त्यावर वार्षिक सरासरी १५% परतावा मिळाला, तर साधारण २८ वर्षांच्या कालावधीत तुमची १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून ५० लाख रुपयांपेक्षा जास्त होते. तुम्ही बाजाराला जितका जास्त वेळ द्याल, तितक्या वेगाने तुमचा पैसा वाढेल.
८१ लाख ते १ कोटीचा प्रवासम्युच्युअल फंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीच्या शेवटच्या वर्षांमध्ये पैशांचा वेग प्रचंड वाढतो. जर तुम्ही तीच १ लाख रुपयांची गुंतवणूक ३० वर्षे कायम ठेवली, तर ती ६६ लाखांच्या पुढे जाते. तर ३२ वर्षांनंतर हा आकडा ८१ लाखांचा टप्पा ओलांडतो. जेव्हा तुमच्या गुंतवणुकीला ३३ ते ३४ वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तुमची सुरुवातीची १ लाख रुपयांची छोटी गुंतवणूक १ कोटी रुपयांच्या जादुई आकड्याला स्पर्श करते.
जोखीम आणि सावधगिरीहे आकडे आकर्षक वाटत असले तरी, गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की म्युच्युअल फंड हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. १५% वार्षिक परतावा हा एक अंदाज आहे; तो बाजाराच्या स्थितीनुसार कमी किंवा जास्त असू शकतो. जोखीम कमी करण्यासाठी नेहमी 'डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड' किंवा 'इंडेक्स फंड'ची निवड करावी. मधल्या काळात पैसे काढल्यास तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न भंगू शकते, त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक कायम ठेवणे आवश्यक आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Mutual funds offer a path to wealth for all. A ₹1 lakh lumpsum investment in a good equity fund, yielding 15% annually, can grow to ₹1 crore in 33-34 years due to compounding. Diversified equity or index funds are recommended, emphasizing long-term commitment to mitigate market risks.
Web Summary : म्यूचुअल फंड सभी के लिए धन का मार्ग प्रशस्त करते हैं। एक अच्छे इक्विटी फंड में ₹1 लाख का एकमुश्त निवेश, जो सालाना 15% रिटर्न देता है, चक्रवृद्धि ब्याज के कारण 33-34 वर्षों में बढ़कर ₹1 करोड़ हो सकता है। बाजार के जोखिमों को कम करने के लिए विविध इक्विटी या इंडेक्स फंड की सिफारिश की जाती है, जो दीर्घकालिक प्रतिबद्धता पर जोर देते हैं।