mutual fund sip : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने यातील जोखीम बऱ्यापैकी कमी होत आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे अगदी १०० रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर तुमच्यात आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. आर्थिक स्वातंत्र्य आणि निवृत्तीपर्यंत जर चांगला निधी जमा करायचा असेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला दरमहा ५००० रुपये गुंतवणूक १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर किती वर्ष लागतील माहिती आहे का?
म्युच्युअल फंडातील चक्रवाढ व्याजाची जादूगेल्या ५ महिन्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ झाली. बाजार उच्चांकी पातळीवरुन नीचांकी पातळीवर घसरला. अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. अशा परिस्थितीतही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कायम होता. जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी देखील गोळा करू शकता. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास सरासरी १२ टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे. ही एक बाजाराशी जोडलेली योजना आहे. त्यामुळे बाजारातील चढ-उताराचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवरही होतो.
१ कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल?जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी दरमहा ५००० रुपये नियमितपणे गुंतवले तर तुम्ही १ कोटी रुपयांपर्यंत निधी गोळा करू शकता. यासाठी तुम्हाला २७ वर्षे सतत दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागतील. सलग २७ वर्षे दरमहा ५००० रुपये गुंतवून, तुम्ही एकूण १६,२०,००० रुपये गुंतवाल. १२ टक्के दराने, तुम्हाला २७ वर्षांनंतर एकूण १,०८,११,५६५ रुपयांचा निधी मिळेल. या गुंतवणुकीतून, तुम्हाला एकूण ९१,९१,५६५ रुपये नफा मिळेल.
वाचा - टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)