Join us

कमाईची संधी! ₹१०० पासून नव्या फंडमध्ये करू शकता गुंतवणूक, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:45 IST

Mutual Fund NFO: एनएफओ १० जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २४ जानेवारी २०२५ रोजी तो बंद होईल.

Mutual Fund NFO: डीएसपी म्युच्युअल फंडानं (DSP Mutual Fund) नवीन फंड ऑफर (NFO) डीएसपी बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० इंडेक्स फंड (DSP BSE Sensex Next 30 Index Fund) लाँच केलाय. बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० निर्देशांकाला ट्रॅक करणाऱ्या या ओपन एंडेड योजना आहेत. एनएफओ १० जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २४ जानेवारी २०२५ रोजी तो बंद होईल.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

DSP Mutual Fund NFO: ₹१०० पासून गुंतवणूक

डीएसपी म्युच्युअल फंडाच्या म्हणण्यानुसार, या योजनेत किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. यानंतर तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० निर्देशांकात अशा कंपन्यांचा समावेश आहे जे बीएसई सेन्सेक्सचा भाग नाहीत, परंतु त्यांचं मार्केट कॅप मोठं आहे आणि भविष्यात त्यांच्यात वाढीची क्षमता आहे.

या योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० निर्देशांकाच्या कामगिरीच्या अनुषंगानं परतावा मिळविणं हा आहे, जो ट्रॅकिंग एररच्या अधीन आहे. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार एकरकमी गुंतवणूक किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) निवडू शकतात.

कोण करू शकतं गुंतवणूक?

अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणायचं आहे त्यांच्यासाठी हा फंड चांगला पर्याय ठरू शकतो. गुंतवणूकदार आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार त्याची निवड करू शकतात.

(टीप - यामध्ये केवळ एनएफओविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा