Join us

नवीन वर्षात मल्टी अ‍ॅसेट म्युच्युअल फंड बदलतील तुमचं नशीब?; या 3 घटकांमुळे ठरतात वेगळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:59 IST

Multi Asset Mutual Fund : मल्टी अ‍ॅसेट फंड संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन देतो. तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य असल्याने जोखीम बऱ्याचअंशी कमी होते.

Multi Asset Mutual Fund : सरते वर्ष शेअर मार्केटसाठी चढ उतार असलेले ठरले. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांनी चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावून दिला. आता नवीन वर्षात कोणते म्युच्युअल फंड अव्वल राहतील? कुठे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल? या गोष्टींची शोधाशोध सुरू झाली आहे. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर ही बातमी तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देईल. तुमच्यासाठी २०२५ मध्ये मल्टी-अ‍ॅसेट म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. 

फंड व्यवस्थापकाकडे लवचिकता पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा मल्टी-अ‍ॅसेट फंड विशेष आहेत.. कारण, यांच्या फंड व्यवस्थापकांना गुंतवणूक करण्यासाठी लवचिकता प्राप्त होते. उदाहरणार्थ, इक्विटी सेगमेंटमध्ये, फंड व्यवस्थापक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये गुंतवणूक करू शकतात, स्थिरता आणि उच्च वाढीच्या संधींचे योग्य मिश्रण येथे मिळते. त्याचप्रमाणे, डेट (कर्ज) विभागामध्ये, फंड व्यवस्थापक बाजाराच्या परिस्थितीनुसार कालावधी समायोजित करू शकतो आणि सरकारी रोखे किंवा उच्च दर्जाचे कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतो. मल्टी अ‍ॅसेट फंड्स एकाच गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये सर्व पर्याय पूर्ण करण्याची परवानगी देतो. म्हणजे याचा फंड व्यवस्थापक इक्विटीसोबत डेटमध्येही गुंतवणूक करू शकतो.

मल्टी अ‍ॅसेट फंड्समध्ये गुंतवणूक का करावी?मल्टी अ‍ॅसेट फंड संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन देतात. मालमत्ता वर्गांमध्ये संतुलित वाटप सातत्यपूर्ण आणि स्थिर परतावा सुनिश्चित करून जोखीम कमी करते. मल्टी अ‍ॅसेट फंड या वस्तुस्थितीचा फायदा घेतात की मालमत्ता वर्ग अनेकदा वेगवेगळ्या बाजार परिस्थितींमध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. डेटा पाहिला तर लक्षात येते की इक्विटी आणि निश्चित उत्पन्न वाटपासह सोन्यात गुंतवणूक केल्याने पोर्टफोलिओ कामगिरी सुधारते. या धोरणामुळे नकारात्मक परताव्याची संभाव्यता कमी झाली, शिवाय १० टक्क्यांपेक्षा जास्त परताव्याची शक्यता वाढली. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परिणामांची हमी देत ​​नाही. मात्र, पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी सोने हा एक प्रभावी पर्याय आहे. पोर्टफोलिओच्या कामगिरीमध्ये ते महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

मल्टी अ‍ॅसेट फंड्स कसे काम करतो? जर तुम्हाला गुंतवणुकीतील जोखीम कमी करायची असेल आणि वैविध्य हवे असेल तर मल्टी इस्टेट फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. मल्टी अ‍ॅसेट फंड इक्विटी, कर्ज, सोने आणि सरकारी रोखे आणि बाँड्समध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे तुम्हाचा एकाच ठिकाणी गुंतवणूक करुनही पोर्टफॉलिओत वैविध्य साधता येते. गेल्या वर्षभरात क्वांट मल्टी अ‍ॅसेट फंड डायरेक्ट-ग्रोथ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अ‍ॅसेट फंड डायरेक्ट-ग्रोथ, यूटीआय मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड डायरेक्ट-ग्रोथ यासारख्या मल्टी अ‍ॅसेट फंडांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : यात गुंतवणूक पर्यायांची माहिती देण्यात आलेली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार