Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीसाठी 'मल्टी-ॲसेट' फंडांचा मत्र! निफ्टीलाही टाकले मागे; सोने-चांदीच्या झळाळीमुळे गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:20 IST

Multi-Asset Funds : शेअर बाजारातील अस्थिरतेमध्ये, मल्टी-अॅसेट फंडांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे! सोने आणि चांदीच्या विक्रमी किमतींमुळे, या फंडांनी निफ्टीलाही मागे टाकले आहे.

Multi-Asset Funds : शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांचा कल आता एकाच ठिकाणी पैसा अडकवण्याऐवजी 'मल्टी-ॲसेट अलोकेशन फंड्स'कडे वेगाने वळत आहे. एएमएफआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात या श्रेणीतील मालमत्ता व्यवस्थापन ७२ टक्क्यांनी वाढून १.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जेव्हा निव्वळ इक्विटी फंडांच्या परताव्यात घट झाली, तेव्हा या फंडांनी गुंतवणूकदारांचे भांडवल सुरक्षित ठेवत भरघोस नफा मिळवून दिला आहे.

निफ्टीला पछाडत २३% परतावामल्टी-ॲसेट फंडांनी गेल्या वर्षभरात सरासरी २३% इतका शानदार परतावा दिला आहे. याउलट, शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक असलेल्या 'निफ्टी-५०' ने याच काळात केवळ १४.२७% परतावा दिला. या यशामागे सोने आणि चांदीमधील गुंतवणूक मुख्य ठरली आहे. गेल्या वर्षभरात चांदीने १७१% ची ऐतिहासिक वाढ नोंदवली. सोन्याच्या दरातही ८१% नी वाढ झाली असून, याचा थेट फायदा या फंडांच्या गुंतवणूकदारांना मिळाला.

ऑटोमॅटिक रीबॅलेंसिंग: पोर्टफोलिओ बदलण्याचे टेन्शन मिटलेया फंडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे फंड एकाच वेळी शेअर्स, फिक्स्ड इन्कम (कर्जरोखे) आणि मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करतात. सिफ्ट कॅपिटलचे विनीत नंदा यांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांकडे बाजार सतत ट्रॅक करण्यासाठी वेळ नाही, त्यांच्यासाठी हे फंड सर्वोत्तम आहेत. जर शेअर बाजार खूप वधारला, तर फंड मॅनेजर स्वतः तिथून नफा काढून सोन्यात किंवा फिक्स्ड इन्कममध्ये गुंतवतात. यामुळे बाजारातील पडझडीच्या वेळी गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान होत नाही.

करात सवलत आणि तज्ज्ञांचा सल्लाव्हेंचुरा सिक्युरिटीजचे संचालक जुजर गबाजीवाला यांच्या मते, या फंडांतून मिळणारा करविषयक फायदा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः शेअर्स विकून सोने खरेदी केले, तर प्रत्येक व्यवहारावर कर द्यावा लागतो. मात्र, फंड मॅनेजरने फंडाच्या अंतर्गत केलेल्या बदलांवर गुंतवणूकदाराला कोणताही कर द्यावा लागत नाही. काही मल्टी-ॲसेट फंड ६५% हिस्सा शेअर्समध्ये ठेवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना 'लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स' कराचा लाभ घेता येतो.

वाचा - मुलांचे शिक्षण आणि पेन्शनसाठी नवा पर्याय! सेबीचा 'लाईफ सायकल फंड' लाँच; राधिका गुप्तांकडून कौतुक

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Multi-asset funds shine, outperforming Nifty; gold & silver boost returns.

Web Summary : Multi-asset funds are gaining popularity amid market volatility, offering higher returns than Nifty. Investments in gold and silver have fueled this growth, with automatic rebalancing minimizing risk for investors. Tax benefits add to the appeal.
टॅग्स :म्युच्युअल फंडगुंतवणूकशेअर बाजारस्टॉक मार्केट