Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:46 IST

जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नव्या संस्थेने आपल्या मॅनेजिंग बोर्ड टीमची घोषणा केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन झालेल्या जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नव्या संस्थेने आपल्या मॅनेजिंग बोर्ड टीमची घोषणा केली आहे. कंपनीने यासोबतच एक नवीन डिजिटल वेबसाइट देखील लाँच केली आहे, ज्याद्वारे सामान्य गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक प्रक्रिया सुलभ होणार आहे.

कोण आहेत मॅनेजिंग बोर्डमधील प्रमुख चेहरे?जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅनेजिंग बोर्डमध्ये गौरव नागोरी यांना सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी), अमित भोसले यांना सीआरओ (मुख्य जोखीम अधिकारी), अमोल पै यांना सीटीओ (मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) आणि बिरजा त्रिपाठी यांना सीपीओची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व दिग्गजांकडे मालमत्ता व्यवस्थापन, तंत्रज्ञान नवोन्मेष, आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा समृद्ध अनुभव आहे.

सुलभ गुंतवणुकीचा ध्यासभारतात गुंतवणुकीला अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकांसाठी परवडणारे बनवणे, हा या कंपनीचा उद्देश आहे. जिओ ब्लॅकरॉकचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सिड स्वामिनाथन यांनी म्हटले  की, "ही आमच्यासाठी एक निर्णायक वेळ आहे. आमची टीम डिजिटल-फर्स्ट, मूल्याधारित उत्पादनांवर काम करत असून लवकरच अनेक गुंतवणूक पर्याय बाजारात घेऊन येईल."

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरेल वेबसाइटजिओ ब्लॅकरॉकच्या नव्या वेबसाइटवर संभाव्य गुंतवणूकदारांसाठी प्राथमिक माहिती, शैक्षणिक साहित्य आणि कंपनीच्या आगामी योजनांचे पूर्वावलोकन मिळणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांना गुंतवणुकीच्या मूलभूत बाबी समजावून सांगणारा कंटेंटही उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे, गुंतवणूक प्रक्रियेत आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल.

SEBIकडून म्युच्युअल फंड व्यवसायासाठी मान्यता२६ मे २०२५ रोजी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास अधिकृत मान्यता मिळाली आहे. सीईओ सिड स्वामिनाथन यांना मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यामुळे आता ही कंपनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून भारतातील गुंतवणूकदारांना चांगले परतावे देईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :निधीजिओ