Personal Finance : प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते की आपल्याकडे आयुष्याच्या एका टप्प्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी असावा. मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा निवृत्तीनंतरचे सुखद आयुष्य यासाठी मोठा फंड जमा करणे आता अशक्य राहिलेले नाही. गरज आहे ती फक्त शिस्तबद्ध गुंतवणुकीची. म्युच्युअल फंडमधील 'एसआयपी' आणि '२१x१०x१२' हा खास फॉर्म्युला वापरून तुम्ही सहजपणे १ कोटी रुपयांहून अधिक निधी उभा करू शकता.
काय आहे हा '२१x१०x१२' फॉर्म्युला?हा फॉर्म्युला एसआयपी गुंतवणुकीवर आधारित आहे. यातील प्रत्येक अंकाचा अर्थ समजून घेऊया.
- २१ (कालावधी) : तुम्हाला सलग २१ वर्षे गुंतवणूक करायची आहे.
- १० (रक्कम): तुमची दरमहा एसआयपी १०,००० रुपये असावी.
- १२ (परतावा) : दीर्घकाळात म्युच्युअल फंडकडून अपेक्षित असलेला किमान सरासरी १२% परतावा.
गणितातून समजून घेऊया कोट्यधीश होण्याचा मार्गसमजा तुमचे वय आज ३० वर्षे आहे आणि तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार गुंतवणूक सुरू केली, तर त्याचे गणित कसे असेल?
- मासिक गुंतवणूक : १०,००० रुपये
- एकूण कालावधी : २१ वर्षे (२५२ महिने)
- तुमची एकूण गुंतवणूक : २५,२०,००० रुपये
- अपेक्षित परतावा (१२% दराने): ७९,१०,०६७ रुपये (केवळ व्याज)
- एकूण निधी: १,०४,३०,०६७ रुपये (१ कोटी ४ लाख रुपये)
- म्हणजेच वयाच्या ५१ व्या वर्षी तुमच्या हातात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल. जर या काळात परतावा १२ टक्क्यांऐवजी १५ किंवा १८ टक्के मिळाला, तर हा निधी २ कोटींच्याही पुढे जाऊ शकतो.
चक्रवाढ व्याजाची ताकदएसआयपीमध्ये गुंतवणूक करताना 'कंपाउंडिंग' हा सर्वात मोठा फायदा ठरतो. तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तेवढा अधिक परतावा तुम्हाला मिळतो. दीर्घकाळात तुम्ही केवळ मुद्दलावरच नाही, तर व्याजावरही व्याज कमवता. म्हणूनच, गुंतवणुकीला वेळ देणे हे रकमेपेक्षा जास्त महत्त्वाचे असते.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स
- बाजार चढो किंवा पडो, तुमची एसआयपी कधीही बंद करू नका.
- विसाव्या किंवा तिसाव्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत मोठा फंड जमा होतो.
- दरवर्षी पगार वाढल्यावर एसआयपीची रक्कम १० टक्क्यांनी वाढवल्यास तुम्ही १ कोटीचे लक्ष्य अधिक वेगाने गाठू शकता.
वाचा - इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Achieve financial freedom with disciplined SIP investments. The '21x10x12' formula—investing ₹10,000 monthly for 21 years, expecting 12% returns—can yield over ₹1 crore by age 51. Early investing and compounding are key. Increase SIP amount with salary hikes for faster results.
Web Summary : अनुशासित एसआईपी निवेश से वित्तीय स्वतंत्रता प्राप्त करें। '21x10x12' फॉर्मूला - 21 वर्षों के लिए ₹10,000 मासिक निवेश, 12% रिटर्न की उम्मीद - 51 वर्ष की आयु तक ₹1 करोड़ से अधिक दे सकता है। जल्दी निवेश और चक्रवृद्धि ब्याज महत्वपूर्ण हैं। तेजी से परिणाम के लिए वेतन वृद्धि के साथ एसआईपी राशि बढ़ाएं।