Join us

पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:42 IST

Inflation Calculator: तुम्ही जर एसआयपीद्वारे पुढची २० ते ३० वर्ष गुंतवणूक करुन १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्याचा विचार करत असाल तर ३० वर्षानंतर तुमच्या पैशाचे मूल्य किती असेल माहिती आहे का?

Inflation Calculator: कोविड महामारीनंतर देशासह जगभरात अनेक गोष्टी वेगाने बदल आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुमच्या पैशांचे मूल्यही झपाट्याने घसरत आहे. विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात महागाई झपाट्याने वाढली आहे. पूर्वी जिथं १० ते २० लाखांत घर यायचं तिथं आहे, ५० ते ६० लाख रुपये लागत आहे. आजच्या काळात मुंबई सारख्या ठिकाणी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत देखील ३BHK फ्लॅट मिळणे सोपे राहिले नाही. मुंबईत या किमतीत ३BHK फ्लॅट मिळणे कठीण आहे. परिणामी पॉश भागात घर घेण्याचं स्वप्न सामान्य लोकांसाठी स्वप्नच राहणार आहे. मात्र, तुमच्या १ कोटी रुपयांचे मूल्य ३० वर्षानंतर किती असेल? याचा विचार केला आहे का?

इतर मेट्रो शहरांमध्ये ही महागाई आणखी जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आता SIP किंवा इतर कोणत्याही पद्धतीने १ कोटी रुपये उभे करण्याचा विचार करत असाल. त्यासाठी तुम्हाला २० ते ३० वर्षे खर्ची घालावी लागतील. तर तुमच्यासाठी १ कोटी रुपये पुरेसे नाहीत. २० किंवा ३० वर्षांनंतर, १ कोटी रुपयांऐवजी, तुम्हाला किमान दुप्पट किंवा चार पट संपत्ती जमा करावी लागेल, तेव्हा तुम्ही २० किंवा ३० वर्षांनंतर आजच्या काळातील १ कोटी रुपयांचे मूल्य तेव्हा मिळवू शकता.

३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांची किंमत किती असेल?वाढत्या महागाईमुळे जमा केलेल्या पैशाचे मूल्यही कालांतराने कमी होत जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही ३० वर्षांत १ कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली असेल, तर ३० वर्षांनंतर त्या १ कोटी रुपयांची किंमत महागाईमुळे केवळ २३ लाख रुपये होईल. यावरून तुमच्या बचतीवरील परतावा महागाईबरोबरच कमी होत असल्याचे दिसून येते. १ कोटी रुपयांचे मूल्यही चार पटीने कमी होत आहे.

सध्या दिल्लीत १BHK फ्लॅटची किंमत २५ लाख ते ३५ लाख रुपये किंवा त्याहूनही महाग आहे. जर तुम्ही दिल्लीत ३० वर्षांनंतर १ कोटी रुपये देऊन फ्लॅट घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण त्यावेळी तुमचे सध्याचे १ कोटी रुपये फक्त २३ लाख रुपये असतील.

१ कोटी रुपयांच्या बरोबरीने ३० वर्षांनंतर किती रक्कम लागेल? जर तुम्ही सध्या १ कोटी रुपयांची योजना आखत असाल तर ३० वर्षांनंतर ही रक्कम पुरेशी होणार नाही. तुम्हाला ३० वर्षांत ४.३२ कोटी रुपये लागतील. अशा परिस्थितीत, आजच्या किमतीनुसार तुमचे लक्ष्य ३० लाख रुपये असेल आणि तुम्हाला हे लक्ष्य १० वर्षांत गाठायचे असेल, तर तुम्ही वार्षिक महागाई दर ५ टक्के गृहीत धरू शकता. १० वर्षांनंतर ३० लाख रुपयांची किंमत सुमारे २० लाख रुपये होईल.

काय आहे फॉर्म्युला?कोणत्याही किमतीचे भविष्यातील मूल्य मोजण्यासाठी तुम्ही हे सूत्र वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही वार्षिक आधारावर कोणत्याही रकमेचे मूल्य काढू शकता. रकमेचे भविष्यातील मूल्य = रक्कम/(१ + महागाई दर)^वर्षांची संख्या 

टॅग्स :गुंतवणूकबांधकाम उद्योगव्यवसायबँकिंग क्षेत्र