Mutual Fund SIP : दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे मोठा आर्थिक निधी तयार करण्यासाठी म्युच्युअल फंड 'एसआयपी' हे सध्या सर्वात प्रभावी साधन मानले जाते. 'एसआयपी'मध्ये गुंतवणूक जितका जास्त काळ चालू ठेवाल, तितका मोठा फायदा 'चक्रवाढ व्याजा'मुळे मिळतो. पण, केवळ साध्या एसआयपीपेक्षा 'स्टेप-अप' पद्धतीचा वापर केला, तर ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून चक्क ५ कोटींचा टप्पा गाठणे शक्य आहे. हे नेमके कसे घडते, याचे गणित समजून घेऊया.
५ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 'स्टेप-अप' स्ट्रॅटेजीकेवळ ५,००० रुपयांची गुंतवणूक कायम न ठेवता, दरवर्षी त्यामध्ये ६ टक्के वाढ करणे आवश्यक आहे. यालाच 'स्टेप-अप एसआयपी' म्हणतात.
अंदाजित परताव्याचे गणित
| दरमहा गुंतवणूक | वार्षिक वाढ | अंदाजित परतावा (%) | कालावधी | एकूण निधी |
| ५,००० | ६% | १५% | ३० वर्षे | ५.२८ कोटी |
| ५,००० | ६% | १२% | ३५ वर्षे | ५.५२ कोटी |
याचा अर्थ असा की, दरवर्षी पगारात होणाऱ्या वाढीनुसार जर तुम्ही तुमची एसआयपी रक्कम ६ टक्क्यांनी वाढवली, तर ३० ते ३५ वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
गुंतवणुकीपूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काही तांत्रिक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.
- एसआयपीमधील परतावा हा कधीही स्थिर नसतो. तो पूर्णपणे शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. बाजार वधारला तर परतावा वाढतो आणि बाजार पडला तर नुकसानही होऊ शकते.
- शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका अल्पकाळात बसू शकतो, मात्र १० ते १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जोखमीचे प्रमाण अत्यंत कमी होते.
- एसआयपीमधून मिळणाऱ्या नफ्यावर तुम्हाला 'कॅपिटल गेन्स टॅक्स' भरावा लागतो, हे लक्षात घेऊनच आर्थिक नियोजन करा.
वाचा - नोकरदारांसाठी 'अच्छे दिन'! फेब्रुवारीत नोकऱ्यांचा पाऊस, आयटी क्षेत्रात भरतीचा नवा विक्रम
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Mutual Fund SIPs offer long-term wealth creation. Using a 'step-up' approach, increasing SIP investments annually by 6%, can potentially yield ₹5 crore over 30-35 years, depending on market returns. Remember to consider market risks and capital gains tax before investing.
Web Summary : म्यूचुअल फंड एसआईपी दीर्घकालिक धन सृजन प्रदान करते हैं। 'स्टेप-अप' दृष्टिकोण का उपयोग करके, एसआईपी निवेश को सालाना 6% तक बढ़ाने से बाजार रिटर्न के आधार पर 30-35 वर्षों में संभावित रूप से 5 करोड़ रुपये मिल सकते हैं। निवेश करने से पहले बाजार जोखिमों और पूंजीगत लाभ कर पर विचार करना याद रखें।