Investment Plan : अनेकांना वाटते की करोडपती होण्यासाठी प्रचंड मोठी सॅलरी असणे आवश्यक आहे. मात्र, हे धादांत चुकीचे आहे. शिस्तबद्ध नियोजन, गुंतवणुकीत सातत्य आणि चक्रवाढ व्याजाची ताकद वापरली, तर केवळ ५०,००० रुपये पगार असलेली व्यक्तीही २० वर्षांत २ कोटींहून अधिक रुपयांचा निधी उभारू शकते. हे स्वप्न कसे सत्यात उतरवता येईल, याचे सोपे आर्थिक गणित खालीलप्रमाणे आहे.
गुंतवणुकीचा पाया : सुरक्षा आणि आपत्कालीन निधीगुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आर्थिक सुरक्षा कवच असणे अनिवार्य आहे.
- तुमचा मासिक खर्च ३५,००० रुपयांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा.
- ५ लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आणि १.५ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल.
- ६ महिन्यांच्या खर्चासाठी २ ते २.५ लाख रुपयांचा स्वतंत्र फंड डेट फंड किंवा आरडीमध्ये ठेवा, जो संकटाच्या वेळी मदतीला येईल.
दरमहा १५ हजारांची 'स्मार्ट' गुंतवणूकउरलेल्या रक्कमेतून दरमहा १५,००० रुपयांची शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू करा. जोखीम विभागण्यासाठी खालीलप्रमाणे पोर्टफोलिओ तयार करा.
| गुंतवणुकीचा प्रकार | टक्केवारी | गुंतवणूक रक्कम |
| लार्ज कॅप फंड | २०% | ३,००० |
| मिड कॅप फंड | ३०% | ४,५०० |
| फ्लेक्सी/मल्टी कॅप फंड | ४०% | ६,००० |
| मल्टी ॲसेट फंड | १०% | १,५०० |
स्टेप-अप फॉर्म्युला आणि कंपाउंडिंगचा चमत्कारया नियोजनात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'स्टेप-अप'. दरवर्षी तुमच्या पगारातील वाढीनुसार एसआयपीच्या रकमेत केवळ ५ टक्क्यांनी वाढ केली, तर चमत्कार घडू शकतो.
- अंदाजित परतावा : वार्षिक १३% (सरासरी).
- कालावधी : २० वर्षे.
- अंतिम निधी : २० वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे २.१३ कोटी रुपयांचा मोठा निधी उभा असेल.
वाचा - इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांना मोठा धक्का! 'टॅरिफ'ची अब्जावधी डॉलर्सची रक्कम परत करावी लागणार
छोटी सुरुवात, मोठा परिणाम!पगार किती आहे यापेक्षा, तो कसा वापरता आणि किती गुंतवणूक करता, यावर तुमचे भविष्य अवलंबून असते. शिस्तबद्ध खर्च, पुरेशी विमा संरक्षण आणि गुंतवणुकीत दरवर्षी होणारी छोटीशी वाढ तुम्हाला २० वर्षात २ कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट करू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Disciplined investment, consistent savings, and the power of compounding can help individuals with a ₹50,000 salary build a ₹2 crore fund in 20 years. Prioritize security, invest wisely, and increase investments annually.
Web Summary : अनुशासित निवेश, निरंतर बचत और चक्रवृद्धि ब्याज की शक्ति से 50,000 रुपये वेतन वाले व्यक्ति भी 20 वर्षों में 2 करोड़ रुपये का कोष बना सकते हैं। सुरक्षा को प्राथमिकता दें, बुद्धिमानी से निवेश करें और वार्षिक निवेश बढ़ाएं।