Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ₹५ लाखातून रिटायरमेंटमध्ये ₹१.७५ लाख रुपये महिन्याला? पण कसे, समजून घ्या संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:29 IST

Retirement Plan: निवृत्तीचे नियोजन हा केवळ वृद्धांसाठीचा विषय नसून, प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीसाठी तो तितकाच महत्त्वाचा आहे. चांगला पगार असूनही अनेकजण भविष्यासाठी तयार नसतात. मात्र, वेळेत केलेली छोटी गुंतवणूकही भविष्यात मोठा फंड उभा करू शकते.

Retirement Plan: निवृत्तीचे नियोजन (Retirement Planning) हा केवळ वृद्धांसाठीचा विषय नसून, प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीसाठी तो तितकाच महत्त्वाचा आहे. चांगला पगार असूनही अनेकजण भविष्यासाठी तयार नसतात. मात्र, वेळेत केलेली छोटी गुंतवणूकही भविष्यात मोठा फंड उभा करू शकते. योग्य रणनीती आखल्यास एकारकमी गुंतवणुकीतूनही मजबूत मासिक उत्पन्न मिळवता येते.

निवृत्ती नियोजनाचा खरा अर्थ काय?

निवृत्ती नियोजन म्हणजे केवळ पैसे जमा करणं नव्हे, तर असा फंड तयार करणं जो काम थांबवल्यानंतरही तुमच्या गरजा पूर्ण करेल. नोकरीनंतर उत्पन्न थांबतं, पण खर्च थांबत नाहीत. अशा परिस्थितीत, एक मजबूत 'रिटायरमेंट कॉर्पस' आर्थिक सुरक्षा देतो. जर वेळेवर नियोजन केले नाही, तर महागाई, कर्ज आणि अचानक येणारे खर्च भविष्य कठीण करू शकतात. लवकर सुरुवात केल्यामुळे गुंतवणुकीला वाढण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि ही 'वेळ'च सर्वात मोठे शस्त्र ठरते.

लवकर सुरुवात करणे का फायदेशीर आहे?

कमी वयात गुंतवणूक सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'कंपाउंडिंग'ची शक्ती. जेव्हा तुमच्या परताव्यावरही परतावा मिळायला लागतो, तेव्हा पैसा वेगानं वाढतो. समजा, एखाद्या व्यक्तीनं वयाच्या ३० व्या वर्षी ५ लाख रुपये एकरकमी गुंतवले आणि त्याला सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत ही रक्कम सुमारे १.५ कोटी रुपये होऊ शकते. हाच वेळेचा चमत्कार आहे. जर गुंतवणूक उशिरा सुरू केली, तर हेच लक्ष्य गाठण्यासाठी अनेक पटींनी जास्त रक्कम गुंतवावी लागू शकते.

१.५ कोटी रुपयांतून १.७५ लाखांचे मासिक उत्पन्न कसे मिळेल?

निवृत्तीनंतर गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलतं - आता लक्ष वाढीवर नसून नियमित उत्पन्नावर असतं. समजा, निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे १.५ कोटी रुपयांचा फंड आहे. जर ही रक्कम अशा पर्यायात गुंतवली जिथे सरासरी ८ टक्के वार्षिक परतावा मिळेल आणि तुम्ही दरमहा १.७५ लाख रुपये काढले, तर १० वर्षांत तुमची एकूण विड्रॉल २.१० कोटी रुपये असू शकते. या काळात उर्वरित रकमेवर मिळणारा परतावा अतिरिक्त कमाई देखील करून देत राहील. अशा प्रकारे योग्य रणनीतीसह गुंतवलेला पैसा मागे काम करत राहतो आणि तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहते.

वेळ हाच खरा 'गेम चेंजर'

जितकी लवकर सुरुवात, तितका कमी दबाव आणि तितकी जास्त वाढ. काही वर्षांचा उशीरही तुमचे ध्येय महाग करू शकतो. म्हणूनच, तरुण वयातच निवृत्तीच्या नियोजनाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. छोटी सुरुवातही दीर्घकाळात मोठा परिणाम देऊ शकते. शिस्त, संयम आणि योग्य नियोजन - हीच सुरक्षित आणि सन्मानजनक निवृत्तीची गुरुकिल्ली आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीची असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Retire Rich: ₹5 Lakh Investment Yields ₹1.75 Lakh Monthly Income?

Web Summary : Early retirement planning is crucial. Start investing young to leverage compounding. A ₹1.5 crore corpus, yielding 8% annually, can provide ₹1.75 lakh monthly. Time is key.
टॅग्स :गुंतवणूकपैसाम्युच्युअल फंडएसआयपी