Mutual Fund Ratios : आजच्या काळात म्युच्युअल फंड हा भारतीयांच्या पसंतीचा गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे. इक्विटी असो वा डेट, प्रत्येक गुंतवणूकदार अधिक परताव्याच्या आशेने यात पैसे गुंतवत असतो. मात्र, म्युच्युअल फंड हे बाजाराशी जोडलेले असल्याने त्यांचे परतावे कमी-जास्त होत असतात. अनेकदा आपण केवळ गेल्या काही वर्षांचा परतावा पाहून गुंतवणूक करतो, पण ही पद्धत चुकीची ठरू शकते. तुमच्या फंडाची 'प्रकृती' कशी आहे, हे समजून घेण्यासाठी 'म्युच्युअल फंड रेशो' समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करण्यापूर्वी खालील ५ निकष तपासल्यास तुमचा पोर्टफोलिओ अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो.
१. अल्फा : फंडाची खरी कामगिरीअल्फा हा रेशो सांगतो की, तुमच्या फंडाने त्याच्या बेंचमार्कच्या (उदा. निफ्टी ५०) तुलनेत किती जास्त परतावा दिला. जर एखाद्या फंडाचा अल्फा +२ असेल, तर त्याचा अर्थ असा की त्या फंडाने अपेक्षेपेक्षा २% जास्त परतावा दिला आहे. निगेटिव्ह अल्फा म्हणजे फंडाची कामगिरी बेंचमार्कपेक्षा खराब राहिली आहे. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह अल्फा असलेला फंड निवडावा.
२. बीटा : मार्केट रिस्कची ओळखबीटा हा बाजारातील चढ-उतारांशी संबंधित आहे. बाजार १ टक्क्याने हलला तर तुमचा फंड किती प्रमाणात हेलकावे घेईल, हे बीटावरून कळते. बीटा १ असल्यास : फंड बाजारासोबत चालतो. बीटा १ पेक्षा कमी असल्यास : फंडात चढ-उतार कमी आहेत आणि तो स्थिर आहे. बीटा १ पेक्षा जास्त असल्यास : फंडात जास्त जोखीम आहे. आक्रमक गुंतवणूकदार हाय बीटा फंड निवडतात.
३. शार्प रेशो : जोखीम वि. परतावाघेतलेल्या जोखमीच्या बदल्यात फंडाने किती परतावा दिला, हे शार्प रेशोवरून स्पष्ट होते. १ पेक्षा जास्त शार्प रेशो : हा गुंतवणुकीसाठी चांगला मानला जातो. याचा अर्थ फंडाने जोखीम घेऊन योग्य परतावा मिळवून दिला आहे. १ पेक्षा कमी शार्प रेशो : जोखीम जास्त पण परतावा कमी, असे याचे स्वरूप असू शकते.
४. स्टँडर्ड डेव्हिएशन : अस्थिरतेचे मोजमापफंडाचे परतावे त्याच्या सरासरीपेक्षा किती खाली-वर होतात, हे यावरून समजते. जास्त स्टँडर्ड डेव्हिएशन : म्हणजे फंडात प्रचंड अस्थिरता आहे. कमी स्टँडर्ड डेव्हिएशन : ज्यांना स्थिर परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी कमी स्टँडर्ड डेव्हिएशन असलेले फंड योग्य ठरतात.
वाचा - MCX वर 'त्सुनामी'! सोन्यात एका दिवसात ५ हजारांची वाढ; चांदी ३.३४ लाखांच्या ऐतिहासिक शिखरावर
५. आर-स्क्वेअर : बेंचमार्कशी सुसंगततातुमचा फंड त्याच्या बेंचमार्क इंडेक्सला किती जवळून फॉलो करतो, हे यावरून कळते. ७० ते १०० च्या दरम्यान : फंड इंडेक्सच्या ट्रेंडनुसार चालतो. ४० पेक्षा कमी : फंड स्वतःच्या स्वतंत्र धोरणानुसार चालतो, जे 'अॅक्टिव्ह फंड्स'साठी चांगले मानले जाते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Mutual fund investments require understanding key ratios like Alpha, Beta, and Sharpe to assess risk and returns. Higher Alpha and Sharpe ratios are favorable, while Beta indicates market sensitivity. Consider these factors for informed decisions.
Web Summary : म्यूचुअल फंड निवेश के लिए जोखिम और रिटर्न का आकलन करने के लिए अल्फा, बीटा और शार्प जैसे प्रमुख अनुपातों को समझना आवश्यक है। उच्च अल्फा और शार्प अनुपात अनुकूल होते हैं, जबकि बीटा बाजार संवेदनशीलता को इंगित करता है। सूचित निर्णय के लिए इन कारकों पर विचार करें।