High Return Small Cap Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना अनेकदा लोक फक्त मागील परतावे पाहून निर्णय घेतात. पण तुम्हाला माहित आहे का, की गुंतवणुकीतून मिळणारा वास्तविक नफा समजून घेण्यासाठी परताव्याच्या आकड्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा घटक पाहायला लागतो? तो घटक म्हणजे 'खर्चाचे प्रमाण' (Expense Ratio). हा आकडा फंड व्यवस्थापित करण्यासाठी लागणारा खर्च दर्शवतो. जर एखादा फंड चांगला परतावा देत असेल आणि त्याचा खर्चाचे प्रमाण कमी असेल, तर तो गुंतवणूकदारांसाठी अधिक फायदेशीर ठरतो.
कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या अशा टॉप ५ स्मॉल कॅप फंडांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. स्मॉल कॅप फंड हे 'उच्च जोखीम, उच्च परतावा' (High Risk, High Return) या श्रेणीत येतात, पण योग्य नियोजन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीने ते चांगला नफा मिळवून देऊ शकतात.
५ वर्षांत बंपर परतावा देणारे 'हे' टॉप ५ स्मॉल कॅप फंडयेथे दिलेले स्मॉल कॅप फंड्सनी गेल्या ५ वर्षांत एकरकमी गुंतवणूक असो किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) असो, दोन्हीमध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हे सर्व आकडे थेट योजनेसाठी (Direct Plan) आहेत.
टाटा स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- व्हॅल्यू रिसर्च रेटिंग: ४ स्टार
- खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.३४%
- ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४.५५ लाख रुपये
- ५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: ३५.४१%
- ५ वर्षांत मासिक ५,००० रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य: ५,८८,९३३ रुपये (वार्षिक परतावा: २७.३५%)
बंधन स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- व्हॅल्यू रिसर्च रेटिंग: ५ स्टार
- खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.३९%
- ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ५.०२ लाख रुपये
- ५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: ३८.०४%
- ५ वर्षांत मासिक ५,००० रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य: ६,६०,८५४ रुपये (वार्षिक परतावा: ३२.२२%)
एडलवाईस स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- व्हॅल्यू रिसर्च रेटिंग: ४ स्टार
- खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.४३%
- ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४.६९ लाख रुपये
- ५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: ३६.१७%
- ५ वर्षांत मासिक ५,००० रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य: ५,८३,४३० रुपये (वार्षिक परतावा: २६.९५%)
इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- व्हॅल्यू रिसर्च रेटिंग: ५ स्टार
- खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.४४%
- ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४.५८ लाख रुपये
- ५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: ३५.५४%
- ५ वर्षांत मासिक ५,००० रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य: ६,२४,४५५ रुपये (वार्षिक परतावा: २९.८१%)
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड - डायरेक्ट प्लॅन
- व्हॅल्यू रिसर्च रेटिंग: ३ स्टार
- खर्चाचे प्रमाण (Expense Ratio): ०.४७%
- ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य: ४.५८ लाख रुपये
- ५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: ३५.५३%
- ५ वर्षांत मासिक ५,००० रुपयांच्या एसआयपीचे फंड मूल्य: ५,५५,४१६ रुपये (वार्षिक परतावा: २४.९%)
(स्रोत: Value Research, Return Calculator. दिलेले आकडे केवळ उदाहरणादाखल आहेत आणि भविष्यातील परताव्याची हमी देत नाहीत.)
गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हे इक्विटी फंड असल्याने त्यांना अत्यंत उच्च जोखीम श्रेणीत ठेवले जाते. हे फंड दीर्घकाळात सरासरीपेक्षा खूप चांगला परतावा देऊ शकतात. परंतु, बाजारातील चढ-उतारांमुळे त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. त्यामुळे, अल्पावधीसाठी यात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.
वाचा - बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
या फंडात गुंतवणूक करताना किमान ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने काही प्रमाणात जोखीम कमी करता येते, कारण त्यात तुम्ही वेगवेगळ्या बाजारभावावर गुंतवणूक करत असता. ज्या गुंतवणूकदारांना उच्च परताव्यासाठी अधिक जोखीम घेण्याची तयारी आहे, ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हे फंड समाविष्ट करू शकतात. मात्र, स्मॉल कॅपमधील एकूण गुंतवणूक तुमच्या पोर्टफोलिओच्या १०-१५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असा साधारणपणे सल्ला दिला जातो.