Join us

शेअर बाजारासह SIP मध्येही आला भूकंप; जानेवारीत ६१ लाख लोकांनी बंद केली गुंतवणूक, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:27 IST

SIP Investment: शेअर बाजारात विक्रीचा जोरदार सपाटा सुरू आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय. अशा तऱ्हेनं गुंतवणूकदारांचा आता म्युच्युअल फंडांवरील विश्वासही उडत चालल्याचं दिसून येतंय.

SIP Investment: शेअर बाजारात विक्रीचा जोरदार सपाटा सुरू आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय. अशा तऱ्हेनं गुंतवणूकदारांचा आता म्युच्युअल फंडांवरील विश्वासही उडत चालल्याचं दिसून येतंय. गुंतवणूकदार आपले एसआयपी थांबवत आहेत. विशेषत: मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांवरील लोकांचा विश्वास उडत चाललाय. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे. 

शेअर बाजारात अनिश्चितता आहे. लोक अजूनही कमी जोखमीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे पाहत होते. शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंडांना कमी जोखीम असते, असंही बाजारात मानलं जातं. पण आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड रेड झोनमध्ये आहेत. गुंतवणूकदारांना स्मॉल आणि मिड कॅप फंडांची चिंता सतावत आहे. बाजारात जोरदार विक्री सुरू आहे.

६१ लाख एसआयपी रद्द

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार एसआयपी स्टॉपेज रेशोमध्ये वाढ झाली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत ८२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीत एसआयपी बंद झालेल्यांची संख्या ६१.३३ लाख होती, जी डिसेंबरमध्ये ४४.९० लाख होती. त्याचबरोबर एसआयपीमध्येही घसरण दिसून आली आहे. जानेवारीत एसआयपीचा ओघ २६,४०० कोटी रुपये होता, जो डिसेंबरमध्ये २६,४५९ कोटी रुपये होता. एसआयपी इनफ्लोमधील घसरण फारशी लक्षणीय नाही.

AMFI नं सांगितलं कारण

जानेवारीत ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली. मात्र, यामुळे एसआयपीच्या इनफ्लोमध्ये घट झालेली नाही. म्युच्युअल फंड उद्योगासाठी काम करणाऱ्या एएमएफआय या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एसआयपी खाती बंद होण्याचं प्रमुख कारण आरटीएमधील डेटा रिसायकलींग करणं आहे, ज्यामुळे लाखो खात्यांमध्ये सुधारणा झालीये.

टॅग्स :गुंतवणूकपैसा