Join us

हेल्थ इन्शुरन्समधील वेटिंग पिरियड म्हणजे काय आणि तो महत्त्वाचा का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:26 IST

Health Insurance Waiting Period: हेल्थ इन्शुरन्स आता नवीन विषय राहिलेला नाही. आपल्याला हेल्थ इन्शुरन्स गरजेचा आहे हे माहीत असूनही, बरेच लोक ते घेणं टाळतात. कारण? अनेकजण इन्शुरन्स घेताना त्यांना वेटिंग पिरियड हा शब्द दिसतो आणि असा अवघड शब्द ऐकून बरेच लोक गोंधळतात.

Health Insurance Waiting Period: हेल्थ इन्शुरन्स आता नवीन विषय राहिलेला नाही. आपल्याला हेल्थ इन्शुरन्स गरजेचा आहे हे माहीत असूनही, बरेच लोक ते घेणं टाळतात. कारण? अनेकजण ACKO Insurance सारख्या कंपन्यांकडून इन्शुरन्स घेताना त्यांना वेटिंग पिरियड हा शब्द दिसतो आणि असा अवघड शब्द ऐकून बरेच लोक गोंधळतात. तर काय हे वेटिंग पिरियड समजून घेऊया.

वेटिंग पिरियड काय?

नावाप्रमाणेच, ‘वेटिंग पिरियड’ म्हणजे एक ठराविक काळ जिथे तुम्हाला थोडे थांबावं लागतं. इन्शुरन्सच्या भाषेत सांगायचं झालं, तर वेटिंग पिरियड म्हणजे असा कालावधी, ज्यात तुम्ही काही विशिष्ट आजारांसाठी इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही, जरी तुमची पॉलिसी सुरू असली तरी. हा काळ साधारणपणे २ ते ३ वर्षांपर्यंत असू शकतो. तो कोणत्या आजारासाठी आहे आणि कोणत्या इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आहे, यावर अवलंबून असतो. जसं की ACKO Health Insurance सारख्या कंपन्या ‘झिरो वेटिंग पिरियड' सारखा फायदेशीर पर्याय देखील देतात. थोडक्यात सांगायचं तर, पॉलिसी घेतल्यावर लगेच काही दिवसांतच जर तुम्हाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं, तर काही आजारांसाठी तुम्हाला क्लेम मिळणार नाही.

वेटिंग पिरियड का गरजेचा आहे?

इन्शुरन्स कंपनीला फसवणूक आणि मोठ्या आर्थिक नुकसानापासून स्वतःला वाचवणं खूप महत्त्वाचं असतं. जर सगळ्यांनी आजार झाल्यानंतरच इन्शुरन्स घ्यायला सुरुवात केली आणि लगेच क्लेम केला, तर कंपनीचा तोटा होईल आणि अशा पद्धतीनं इन्शुरन्स चालवणं शक्यच होणार नाही. वेटिंग पिरियड, या कालावधीमुळे विमा कंपनीला आर्थिक धोका कमी होतो.

वेटिंग पिरियडचे प्रकार

विम्यांमध्ये काही प्रमुख वेटिंग पिरियडचे प्रकार असू शकतात:

सुरुवातीचा वेटिंग पिरियड (Initial Waiting Period): बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये सुरुवातीला साधारण ३० ते ९० दिवसांचे वेटिंग असते आणि तो प्रत्येक हेल्थ पॉलिसीवर लागू होतो. या काळात अपघातामुळे झालेल्या आपत्कालीन उपचारांव्यतिरिक्त इतर उपचारांकरिता क्लेम मान्य होत नाही.

पहिल्यापासून असणाऱ्या आजारांसाठीचा वेटिंग पिरियड (Pre-Existing Disease Waiting): जर तुम्हाला डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार सारख्या इतर काही आजर आधीपासून असतील तर त्यावर कव्हरेज मिळण्यापूर्वी प्रतीक्षा करावी लागते. नवीन IRDAI नियमांनुसार, आता प्री-एग्झिस्टिंग आजरांसाठीची वेटिंग पिरियड जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत राहील. याचा अर्थ, जर तुम्ही विमा घेत असताना तुमच्या कंपनीला तुमच्या आजाराबद्दल माहिती दिली तर तुम्हाला तो दावा करण्यासाठी ३ वर्षे वाट पहावी लागेल आणि तो तीन वर्षांनंतर पूर्णपणे कव्हर होईल.

विशिष्ट आजारांसाठीचे वेटिंग पिरियड (Specified Diseases Waiting): काही ठराविक आजार किंवा उपचार जसे की हर्निया, मोतीबिंदू, पित्ताशयातील खडे, डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड सारख्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी वेटिंग असतो. IRDAI नियमांनुसार हे पण ३६ महिन्यांवर मर्यादित आहे.

मातृत्व वेटिंग: गर्भधारणा आणि बाळंतपणासाठी अनेक आरोग्य योजना आहेत. मातृत्व आणि बाळंतपणासाठी वेटिंग पिरियड ९ महिने ते ४ वर्षे आहे. याचा अर्थ असा की गर्भधारणा आणि नवजात बाळाच्या काळजीशी संबंधित खर्च त्या वेळेपूर्वी झाल्यास ते कव्हर केले जात नाहीत. काही कंपन्या यात मातृत्व अ‍ॅड-ऑन्स देतात, हे प्रत्येक पॉलिसीनुसार बदलते.

IRDAI च्या नव्या नियमांनुसार बदल

एप्रिल २०२४ मध्ये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) ने वेटिंग पिरियड कमी आणि सोपा करण्यासाठी नवीन नियम लागू केले.

प्री एक्झिस्टिंग आजरांसाठीचा वेटिंग – पूर्वी प्री- एग्झिस्टिंग आजरांसाठीची वेटिंग पिरियड ४ वर्ष होता परंतु आता तो ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कोणत्याही पॉलिसीमध्ये पीईडी वेटिंग पिरियड ३ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.

विशिष्ट आजारांचा वेटिंग – विशिष्ट आजारांसाठी देखील वेटिंग पिरियड ३ वर्ष आहे.

मोरेटोरियम – पूर्वी इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला दिलेली माहिती चुकीची आहे किंवा काही गोष्टी सांगितल्या नाहीत असं सांगून ८ वर्षांपर्यंत क्लेम नाकारू शकत होत्या. पण, आता IRDAI च्या नवीन नियमांनुसार ही कालावधी ८ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

नवीन आणि जुनी पॉलिसी दोन्हींना लागू- हे सर्व बदल जुन्या आणि नवीन दोन्ही पॉलिसींना लागू होतात. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे एखादी जुनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि तुम्ही ती रिन्यू करताय, तर हे नवीन नियम तुम्हालाही लागू होतील. यामुळे जर तुम्हाला पूर्वीपासून असलेले आजार किंवा विशिष्ट आजार असतील, तर तुमच्यासाठी लागू असलेला वेटिंग पिरियड आपोआप कमी होईल.

या बदलांचा तुम्हाला फायदा

पहिल्यांदा पॉलिसी घेणाऱ्यांसाठी मोठा फायदा: जर तुम्ही आता नवीन हेल्थ इन्शुरन्स- पॉलिसी घेत असाल, तर तुम्हाला हे कमी झालेले वेटिंग पिरियड्स लगेच लागू होतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला डायबेटीस असेल, तर आता तीन वर्षांनंतर त्यासाठी क्लेम घेऊ शकता.

जुन्या पॉलिसीधारकांसाठीही लाभ: ज्यांच्याकडे आधीपासून पॉलिसी आहे, त्यांनाही याचा फायदा होणार आहे. पण तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमची पॉलिसीला रिन्यू कराल. म्हणजे लाभ घेण्यासाठी तुम्हाला नवीन पॉलिसी कळायची आवश्यकता नाही.

नियोजन सोपे झाले: आता वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही कारण हे नवीन नियम प्रत्येक विमा कंपनीला लागू आहेत. जर तुम्हाला हे आजार असतील किंवा हे आजार होण्याची शक्यता असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजन करू शकता.

वेटिंग पिरियड व्ययस्थित मॅनेज करण्यासाठी सोप्या टिप्स

वेटिंग पिरियड बद्दल तुम्हाला खूप काही माहिती मिळाली असेल. याला आपल्यासाठी कसा फायदेशीर बनवायचा, हे आपण जाणून घेऊया.

पॉलिसी लवकर खरेदी करा आणि निरोगी रहा: हेल्थ इन्शुरन्स नेहमी तरुण आणि निरोगी असतानाच खरेदी करा. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तुम्ही जेव्हा तरुण आणि निरोगी असता, तेव्हा तुम्हाला वेटिंग पिरियड पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे, जेव्हा तुम्हाला वाढत्या वयानुसार किंवा इतर काही कारणांमुळे उपचारांची गरज भासेल आणि पॉलिसी क्लेम करण्याची वेळ येईल, तेव्हा तुमचे सर्व वेटिंग पिरियड्स पूर्ण झालेले असतील.

विभिन्न पॉलिसी तपासा: IRDAI ने जास्तीत जास्त वेटिंग पिरियड्सची मर्यादा ठरवली आहे, पण काही कंपन्या त्याहूनही कमी वेटिंग पिरियड्स देऊ शकतात. म्हणून वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि कमीत कमी वेटिंग पिरियड असलेली पॉलिसी निवडता येईल.

पूर्ण माहिती द्या: अनेकदा असं होतं की आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो, पण नंतर जेव्हा क्लेम करायची वेळ येते, तेव्हा तो नाकारला जातो. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे तुमच्या आरोग्याची योग्य आणि पूर्ण माहिती इन्शुरन्स कंपनीला न देणे. तुम्हाला आधीपासून असलेले कोणतेही आजार किंवा आधी झालेले मोठे उपचार यांची माहिती लपवू नका.

पॉलिसी निरंतर ठेवा: अतिरिक्त फायदे मिळवत राहण्यासाठी तुम्ही नेहमीच तुमचे प्रीमियम वेळेवर भरले पाहिजेत. जर तुमची पॉलिसी लॅप्स झाली तर वेटिंग पिरियड पुन्हा सुरू होईल जो तुमच्यासाठी नुकसान आहे. सोबतच IRDAIच्या नवीन नियमांनुसार, जर तुमची पॉलिसी ६० महिने सलग चालू असेल, तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला माहिती लपवल्याच्या कारणावरून तुमचा क्लेम नाकारू शकत नाही.

पोर्टेबिलिटी वापरा: जर तुम्ही तुमची विमा कंपनी बदलत असाल, तर पोर्टेबिलिटी निवडा. IRDAI च्या नियमांनुसार, उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या जुन्या पॉलिसीमध्ये एका वर्षाचा वेटिंग पिरियड पूर्ण केला असेल, तर नवीन पॉलिसीमध्ये तो एक वर्ष मोजला जाईल.

ॲड-ऑन कव्हर- अनेक कंपन्या वेटिंग पिरियड कमी करण्यासाठी अधिक प्रीमियम भरण्याचा पर्याय देतात.

पॉलिसी डॉक्युमेंट नीट वाचा: फक्त वेटिंग पिरियडसाठीच नाही, तर इन्शुरन्सच्या प्रत्येक पैलूसाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: तुमच्या पॉलिसीची सर्व कागदपत्रे खूप काळजीपूर्वक वाचा. ही पॉलिसी केवळ एक कागदी व्यवहार नाही, तर ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक सुरक्षा कवच आहे.

ग्रुप इन्शुरन्स पहा: जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल, तर तुम्हाला मिळणाऱ्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्सचा फायदा नक्की घ्यायला हवा. कारण यात वेटिंग पिरियड खूप कमी असतो.

निष्कर्ष

IRDAI च्या नवीन नियमांनुसार, सर्वप्रकारच्या आजारांसाठीची वेटिंग आता जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंतच मर्यादित झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आता लवकर कव्हरेज मिळणार आहे. जर तुम्ही निरोगी असताना पॉलिसी घेतली तर ती नेहमीच तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरक्षा कवच ठरेल. वेगवेगळे विमा पर्याय शोधा आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य पर्याय निवडा. सुरक्षित रहा. निरोगी रहा.

टॅग्स :आरोग्य