- पवन देशपांडे, मुंबई तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवायचे तर विमा काढा... अमूक-तमूक लाभ मिळतील, सुरक्षा कवच नसले तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती दाखवून विमा योजना माथी मारणाऱ्या कंपन्या विम्याच्या प्रिमियममध्ये भरमसाट वाढ करताना दिसत आहेत. दहा वर्षांत प्रीमियमसाठी भरावा लागणारा हप्ता दुप्पट झाला आहे.
विमा कंपन्या अनेक योजनांच्या पोटयोजना आणि त्यावर परत 'रायडर' म्हणून इतर छोट्या योजना जोडतात.
सुरुवातीला भरावा लागणाऱ्या प्रीमियममध्ये दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ केली जाते. दहा वर्षांपूर्वी जो प्रीमियम १००० रुपये भरावा लागत होता तो आता १६०० ते २५०० रुपयांवर गेला आहे. दहा वर्षांपूर्वी आरोग्य विम्यापोटी भरावी लागणारी रक्कम १००० असेल तर ती आता २५०० ते ४००० रुपयांच्या घरात गेली आहे.
४७ हजार कोटी रुपयांची कमाई
जीवन विमा कंपन्यांनी प्रीमियममधून २३-२४ मध्ये ४७,४०७ कोटींचा नफा कमविला आहे.
२२-२३ च्या तुलनेत कंपन्यांच्या नफ्यात १०% वाढ झाली आहे. खासगी विमा कंपन्यांनी १२% नफा कमविला आहे.
५१,५२४ कोटी रुपये कमिशन
विमा एजंटांचे कमिशनही प्रीमियममधून वसूल हाेते. २३-२४ या वर्षात असे ५१,५२४ कोटींचे कमिशन वाटले गेले. यात २१% वाढ झाली.
कसा वाढत गेला प्रीमियम ? प्रीमियम रक्कम (कोटींमध्ये)
२०१९-२० १३,७३६२०२०-२१ १५,१३५२०२१-२२ २०,००१२०२२-२३ २५,२५२२०२३-२४ ३४,५०३