Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:11 IST

Postal Life Insurance PLI Plan: जर तुम्ही देखील विमा घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विमा योजनांच्या वाढत्या बाजारपेठेत जिथे खाजगी कंपन्या उच्च प्रीमियमवर मर्यादित लाभ देत आहेत, तिथे पोस्ट ऑफिसची विमा योजना सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे.

Postal Life Insurance PLI Plan: जर तुम्ही देखील विमा घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विमा योजनांच्या वाढत्या बाजारपेठेत जिथे खाजगी कंपन्या उच्च प्रीमियमवर मर्यादित लाभ देत आहेत, तिथे पोस्ट ऑफिसची विमा योजना (Postal Life Insurance) आपल्या जबरदस्त बोनस आणि विश्वासार्ह सुविधांमुळे सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे. विशेषतः बोनसचा दर इतका आकर्षक आहे की ही योजना इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे.

यामध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) ही भारतातील सर्वात जुनी लाइफ इन्शुरन्स सेवा आहे, जी १०० वर्षांहून अधिक काळ कुटुंबांना सुरक्षा कवच देत आहे. PLI मध्ये वयाच्या १९ व्या वर्षापासूनच सहभागी होऊन तुम्ही ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घेऊ शकता. याचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रत्येक वय आणि गरजेनुसार पॉलिसी उपलब्ध आहेत, ज्या सुरक्षेसोबतच बोनस आणि टॅक्स लाभ देखील देतात.

कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत

पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा इतिहास

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) ही भारतातील सर्वात जुनी लाइफ इन्शुरन्स योजना आहे. याची सुरुवात १ फेब्रुवारी १८८४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना केवळ टपाल कर्मचाऱ्यांसाठी होती. त्यानंतर १८८८ मध्ये टेलिग्राफ विभागातही ती सुरू करण्यात आली. पुढे निमशासकीय कर्मचारीही याच्या कक्षेत आले. आता याची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे.

आता ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी-मजुरांसाठीही उपलब्ध आहे. इंडिया पोस्ट आणि दळणवळण मंत्रालय विभाग ही योजना चालवते. PLI नेच तत्कालीन P&T विभागातील महिला कर्मचाऱ्यांना १८९४ मध्ये विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली. त्याकाळी कोणतीही कंपनी महिला कर्मचाऱ्यांना लाइफ इन्शुरन्स कव्हर देत नव्हती.

युगल सुरक्षा प्लॅन

पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) ची 'युगल सुरक्षा' (Yugal Suraksha) पॉलिसी विवाहित जोडप्यांसाठी खास आहे. या पॉलिसीअंतर्गत पती-पत्नी दोघेही एकाच कव्हरखाली सुरक्षित राहतात. बोनससह मिळणारी रक्कम जोडीदाराला किंवा पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळते, ज्यामुळे जोडप्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते.

युगल सुरक्षा प्लॅनची खास वैशिष्ट्ये

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्याचे वय २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

२. ज्येष्ठ पॉलिसीधारकाचं कमाल वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावं.

३. पॉलिसीचा किमान कालावधी ५ वर्षे आणि कमाल कालावधी २० वर्षे असणं आवश्यक आहे.

४. या योजनेसाठी पती किंवा पत्नी यांपैकी कोणताही एक जण PLI साठी पात्र असणं आवश्यक आहे.

५. युगल सुरक्षा योजनेत किमान विमा संरक्षण २०,००० रुपये असणं आवश्यक आहे.

६. या योजनेत कमाल विमा संरक्षण ५० लाख रुपये निश्चित करण्यात आलं आहे.

७. ही योजना कमी प्रीमियममध्ये जास्त बोनस देते.

८. पॉलिसी घेतल्यापासून ३ वर्षांनंतर यावर कर्ज घेता येऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Single premium, insurance for husband and wife; know how?

Web Summary : Postal Life Insurance offers couples 'Yugal Suraksha' plan. It provides coverage for both spouses under one policy with attractive bonuses. Couples aged 21-45 can get coverage up to ₹50 lakh. Policy offers loan after 3 years.
टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक