Income Tax : भारतीय क्रिकेटपटू मैदानावर जेवढे रन्स काढतात, तेवढाच मोठा हिशोब त्यांना त्यांच्या कमाईवर प्राप्तिकर विभागाला द्यावा लागतो. बीसीसीआयचे मानधन, आयपीएलची करोडोंची बोली आणि जाहिरातींतून मिळणारा पैसा यावर नेमका टॅक्स कसा लागतो? व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांना कोणते नियम लागू होतात? याचा घेतलेला हा विशेष आढावा.
मॅच फी आणि मानधनावर १०% टीडीएसभारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआय किंवा आयपीएल फ्रँचायझींकडून मिळणारी रक्कम ही 'व्यवसाय किंवा पेशा' या गटात मोडते. बीसीसीआय खेळाडूंना मॅच फी देतानाच १० टक्के टीडीएस कापते. ही कपात प्राप्तिकर कायदा २०२५ च्या कलम ३९३ नुसार केली जाते. क्रिकेटपटूंच्या या व्यावसायिक उत्पन्नावर १८ टक्के जीएसटी देखील लागू होतो. मात्र, सरकारने आयोजित केलेल्या सामन्यांसाठी जीएसटीमधून सवलत मिळते.
बक्षीस आणि पुरस्कारांवर ३०% टॅक्सचा फटका!सामनावीर किंवा मालिकावीर म्हणून मिळणाऱ्या रोख रकमेवर सरकारची कडक नजर असते. बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम 'इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न' मानले जाते. यावर थेट ३० टक्के टॅक्स भरावा लागतो. बक्षीस देणारी संस्था ही रक्कम देण्यापूर्वीच ३० टक्के टीडीएस कापून घेते. मात्र, सरकारने दिलेले 'अर्जुन पुरस्कार' किंवा इतर शासकीय सन्मान पूर्णपणे करमुक्त असतात.
आयपीएल आणि खासगी लीगचे गणितआयपीएलमधील ऑक्शन फी, रिटेन्शन मनी किंवा साइनिंग बोनस यावरही वैयक्तिक टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो.फ्रँचायझीची भूमिका: संबंधित आयपीएल टीम खेळाडूच्या मानधनातून १० टक्के टीडीएस कापते.व्यावसायिक उत्पन्न: ही सर्व कमाई प्रोफेशनल फी मानली जात असल्याने, त्यावर १८ टक्के जीएसटी भरणे खेळाडूंना अनिवार्य असते.
वाचा - तेल उत्पादक देश इराणमध्येच राशनसारखं मिळतंय पेट्रोल! सरकारकडून नागरिकांना आवाहन
अनिवासी खेळाडूंसाठी काय नियम?जर एखादा खेळाडू भारताचा रहिवासी असेल, तर त्याला जगात कुठेही खेळून मिळालेल्या उत्पन्नावर भारतात टॅक्स द्यावा लागतो. याउलट, जर एखादा खेळाडू 'एनआरआय' असेल, तर त्याला फक्त भारतातून मिळालेल्या उत्पन्नावरच (उदा. भारतातील आयपीएल सामने) कर भरावा लागतो.
Web Summary : Indian cricketers face taxes on BCCI pay, IPL earnings, and endorsements. Match fees are taxed with TDS, while prizes face a 30% tax. Rules differ for resident and NRI players.
Web Summary : भारतीय क्रिकेटरों को बीसीसीआई वेतन, आईपीएल कमाई और विज्ञापन पर करों का सामना करना पड़ता है। मैच फीस पर टीडीएस के साथ कर लगता है, जबकि पुरस्कारों पर 30% कर लगता है। निवासी और अनिवासी खिलाड़ियों के लिए नियम अलग-अलग हैं।