Income Tax UPI Payment : काही वर्षांपूर्वी इन्कम टॅक्स भरायचा म्हणजे बँक गाठणे, नेट बँकिंगमध्ये लॉगिन करणे आणि अनेक किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. मात्र, आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. इन्कम टॅक्स विभागाने कर भरण्याची प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की, तुम्ही तुमच्याच मोबाईलमधून, UPI ॲप्सचा वापर करून मिनिटांत कर जमा करू शकता!
UPI मुळे टॅक्स भरणे का झाले सोपे?आता इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर पेटीएम, फोन पे आणि गुगल पे यांसारख्या ॲप्सद्वारे थेट UPI पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातात. काही सेकंदांतच चलन तयार होते. यामुळे कोणताही मोठा किंवा अतिरिक्त सेटअप करण्याची गरज लागत नाही.
UPI द्वारे इन्कम टॅक्स कसा भरावा? (स्टेप बाय स्टेप प्रोसेस)
- लॉगिन करा: incometax.gov.in या पोर्टलवर जा आणि पॅन व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- e-Pay Tax निवडा: डॅशबोर्डवरील ‘e-Pay Tax’ हा पर्याय निवडा. (लॉगिन न करताही पेमेंट करता येते, पण लॉगिन करणे अधिक सोयीचे असते.)
- कर प्रकार निवडा: ‘New Payment’ वर क्लिक करून भरावा लागणारा कराचा प्रकार (उदा. ॲडव्हान्स टॅक्स, सेल्फ-असेसमेंट टॅक्स) निवडा.
- माहिती भरा: योग्य Assessment Year निवडून तुम्हाला भरायची असलेली रक्कम नमूद करा.
- कन्फर्म करा: तुमचे नाव आणि पॅन क्रमांक तपासा आणि कन्फर्म करा.
- UPI मोड निवडा: पोर्टल चलन तयार करेल आणि उपलब्ध पेमेंट मोड्स दाखवेल. त्यापैकी UPI मोड निवडा.
- स्कॅन करा: स्क्रीनवर दिसणारा QR कोड किंवा दिलेला UPI ID नोट करा/स्क्रीनवर ठेवा.
- पेमेंट करा: तुमच्या मोबाईलवर Paytm/PhonePe/Google Pay उघडा आणि ‘Scan & Pay’ निवडा. QR कोड स्कॅन करून रक्कम तपासा आणि UPI PIN टाकून पेमेंट कन्फर्म करा.
- स्थिती तपासा: ई-फायलिंग पोर्टलवर परत या आणि ‘Payment history’ मध्ये तुमच्या पेमेंटची स्थिती तपासा. हे सहसा १-२ मिनिटांत ‘Paid’ झालेले दिसते.
- पावती डाउनलोड करा: 'Payment history' मधून तुमची पावती/चलन डाउनलोड करा आणि CIN/UTR क्रमांक कायदेशीर पुराव्यासाठी जपून ठेवा.
पेमेंट करताना घ्यावयाची काळजी
- 'Pending' स्टेटस : पेमेंट झाल्यावर पोर्टलवर ‘Pending’ दिसत असल्यास ३० ते ६० मिनिटे थांबा आणि पुन्हा रिफ्रेश करून तपासा.
- चलन न मिळाल्यास : जर पैसे बँक स्टेटमेंटमधून कट झाले असतील आणि चलन तयार झाले नसेल, तर त्वरित तिकीट काढा किंवा UTR (Unique Transaction Reference) क्रमांकासह बँक/UPI सपोर्टशी संपर्क साधा.
- फेल पेमेंट : फेल झालेले UPI पेमेंट साधारणपणे काही वेळात आपोआप परत येतात. स्थिती स्पष्ट झाल्यावरच दुसरे पेमेंट करा.
वाचा - सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
एकूणच, इन्कम टॅक्स जमा करण्याची प्रक्रिया आता पूर्वीसारखी किचकट राहिलेली नाही. UPI पेमेंटचा हा नवीन पर्याय करदात्यांसाठी एक मोठी सवलत आहे.
Web Summary : Income tax payment simplified! Now pay in minutes via UPI apps like Paytm, PhonePe & Google Pay. Just log in, select tax type, assessment year, pay via UPI, and download receipt. Avoid long queues and net banking hassles!
Web Summary : इनकम टैक्स भुगतान हुआ आसान! पेटीएम, फोनपे और गूगल पे जैसे यूपीआई ऐप्स से मिनटों में भुगतान करें। लॉग इन करें, टैक्स का प्रकार चुनें, असेसमेंट वर्ष चुनें, यूपीआई से भुगतान करें और रसीद डाउनलोड करें। लंबी कतारों और नेट बैंकिंग की परेशानी से बचें!