Join us

रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:09 IST

GST Notice To Tata Steel : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी ज्या कंपनीतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्या कंपनीला कर विभागाने १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची नोटीस पाठवली आहे.

Notice To Tata Steel : रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या टाटा समुहातील एक प्रमुख कंपनी टाटा स्टीलला कर विभागाने मोठा धक्का दिला आहे. कंपनीला १००७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची जीएसटी नोटीस पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे आता कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताने आधीच टाटा समूह चर्चेत होता.

काय आहे नोटीसमधील कारण?रांची येथील केंद्रीय कर आयुक्त कार्यालयाने २७ जून रोजी ही नोटीस जारी केली आहे. कर विभागाच्या म्हणण्यानुसार, टाटा स्टीलने २०१८-१९ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,००७ कोटी रुपयांहून अधिक 'इनपुट टॅक्स क्रेडिट' (ITC) चुकीच्या पद्धतीने घेतले आहे. हे जीएसटी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे कर विभागाचे म्हणणे आहे.

टाटा स्टीलचे उत्तरटाटा स्टीलने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले आहे की, त्यांना या नोटीसला ३० दिवसांच्या आत उत्तर द्यायचे आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, यातील ५१४.१९ कोटी रुपये त्यांनी आधीच जीएसटी म्हणून जमा केले आहेत. कंपनीच्या मते, ही एक सामान्य व्यावसायिक प्रक्रिया असून, याचा त्यांच्या कामकाजावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. योग्य व्यासपीठावर या नोटीसला उत्तर दिले जाईल, असेही कंपनीने सांगितले आहे.

वाचा - फक्त १२ दिवसांत ४२,७४२ कोटी रुपयांचा नफा! 'या' स्टॉकने एका झटक्यात CEO चे नशीब बदलले, पण कसे?

'इनपुट टॅक्स क्रेडिट' म्हणजे काय?सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा एखादी कंपनी वस्तू खरेदी करते, तेव्हा त्यावर भरलेल्या कराचा फायदा ती वस्तू विकताना घेऊ शकते. यामुळे एकाच गोष्टीवर दोनदा कर लागत नाही. कर विभागाला असे वाटते की टाटा स्टीलने हे क्रेडिट घेताना नियमांचे योग्य पालन केले नाही. आता कंपनी या नोटिशीवर काय उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :रतन टाटाटाटाइन्कम टॅक्सकरजीएसटी