Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:07 IST

ITR Deadline : ३१ डिसेंबरची अंतिम मुदत संपल्यानंतरही, कर परतफेडीचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नाही. तुम्हाला दुरुस्ती, प्रक्रिया स्थिती आणि आयटीआर-यू सारख्या पर्यायांद्वारे परतावा मिळू शकतो.

ITR Deadline : जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ (निर्धारण वर्ष २०२५-२६) साठी 'रिवाईज्ड' किंवा 'बिलेटेड' इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची ३१ डिसेंबरची अंतिम मुदत चुकवली असेल, तर आता तुमचे रिटर्न बदलण्याचे दरवाजे अधिकृतपणे बंद झाले आहेत. मात्र, याचा अर्थ तुमचा 'टॅक्स रिफंड' बुडाला असा होत नाही. १ जानेवारी २०२६ पासून रिफंड मिळवण्याचे नियम आणि मार्ग आता बदलले आहेत.

३१ डिसेंबरनंतर नक्की काय बदलले?

  • १ जानेवारीपासून निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी दोन मोठे पर्याय संपले आहेत.
  • बिलेटेड रिटर्न : ज्यांनी अजून रिटर्न भरलेच नव्हते, त्यांना आता ते भरता येणार नाही.
  • रिवाईज्ड रिटर्न : आधी भरलेल्या रिटर्नमधील चुका सुधारण्याची संधी आता संपली आहे.
  • तुमचे रिटर्न प्राप्तिकर विभागाने अद्याप प्रोसेस केले नसले, तरीही आता त्यामध्ये बदल करता येणार नाही.

तरीही रिफंड कसा मिळवायचा?जर तुम्ही मुदतीत (३१ जुलैपर्यंत) रिटर्न भरले असेल आणि तुम्ही रिफंडसाठी पात्र असाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. ३१ डिसेंबरनंतरही प्राप्तिकर विभाग रिटर्न प्रोसेस करून रिफंड जारी करू शकतो. मात्र, काही चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी आता खालील मार्ग उपलब्ध आहेत.१. 'रेक्टिफिकेशन' (कलम १५४) चा आधारजर तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून कलम १४३(१) अंतर्गत सूचना मिळाली असेल आणि त्यामध्ये रिफंडची रक्कम चुकीची दिसत असेल, तर तुम्ही ऑनलाइन 'रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट' फाईल करू शकता.कधी वापरता येते? टीडीएस (TDS/TCS) मिसमॅच असल्यास, गणितात चूक झाली असल्यास किंवा क्लेरिकल चूक असल्यास हा पर्याय सर्वात प्रभावी आहे.हा पर्याय ३१ डिसेंबरनंतरही पोर्टलवर उपलब्ध असतो.

२. अपडेटेड रिटर्नटॅक्सपेयर्स अजूनही 'अपडेटेड रिटर्न' भरू शकतात, पण याला काही मर्यादा आहेत.ITR-U फक्त तेव्हाच भरता येते जेव्हा तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न जाहीर करायचे असेल. यातून तुम्ही नवीन रिफंड क्लेम करू शकत नाही किंवा असलेल्या रिफंडची रक्कम वाढवू शकत नाही. उलट, यासाठी तुम्हाला अतिरिक्त दंड आणि व्याज भरावे लागते.

तुमचे रिटर्न अजूनही 'प्रक्रिये'मध्ये आहे?जर तुमच्या आयटीआरचे स्टेटस अद्याप 'Under Processing' दिसत असेल, तर घाबरू नका. सीपीसीकडे रिटर्न प्रोसेस करण्यासाठी ठराविक वेळ असतो. जर सर्व माहिती अचूक असेल, तर तुमचा रिफंड व्याजासह तुमच्या खात्यात जमा होईल. विलंब होत असल्यास तुम्ही पोर्टलवर किंवा 'CPGRAMS' द्वारे तक्रार नोंदवू शकता.

आता कोणत्या गोष्टी करता येणार नाहीत?

  1. रिफंड वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूक दाखवता येणार नाही.
  2. कराचे ओझे कमी करण्यासाठी सवलतींमध्ये बदल करता येणार नाही.
  3. असेसमेंट इयर २०२५-२६ साठी नवीन 'बिलेटेड' रिटर्न आता भरता येणार नाही.

वाचा - भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?

करदात्यांनी आता काय करावे? (चेकलिस्ट)

  • सर्वात आधी इनकम टॅक्स पोर्टलवर जाऊन लॉगिन करा आणि तुमच्या रिटर्नचे स्टेटस तपासा.
  • जर 'इंटिमेशन नोटीस' आली असेल, तर ती नीट वाचून रिफंडच्या रकमेची खात्री करा.
  • तुमचे बँक खाते पोर्टलवर लिंक आणि 'Validated' असल्याची खात्री करा, अन्यथा रिफंड रखडू शकतो.
  • जर विभागाने काही कागदपत्रांची मागणी केली असेल, तर त्याला त्वरित प्रतिसाद द्या.
English
हिंदी सारांश
Web Title : Missed ITR Deadline? Here's How to Still Get Your Tax Refund!

Web Summary : Even after the ITR deadline, a tax refund is possible. Rectification under Section 154 and updated returns offer avenues. Monitor ITR status, validate bank details, and respond promptly to department requests for a smooth refund process.
टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाकर