Tax Planning : आज आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे टॅक्स प्लॅनिंग पूर्ण केले नसेल, तर तुमच्याकडे केवळ काही तास उरले आहेत. उद्या, १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ आणि संभाव्य दंड टाळण्यासाठी 'ही' ५ कामे आजच पूर्ण करा.
१. टॅक्स सेव्हिंग गुंतवणुकीची शेवटची संधीज्या करदात्यांनी जुनी कर प्रणाली निवडली आहे, त्यांच्यासाठी कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळवण्याची आज शेवटची संधी आहे.गुंतवणुकीचे पर्याय : पीपीएफ , सुकन्या समृद्धी योजना, एलआयसी प्रीमियम, ईएलएसएस म्युच्युअल फंड आणि एनपीएस.अतिरिक्त लाभ: कलम 80D (हेल्थ इन्शुरन्स) आणि एनपीएसमध्ये अतिरिक्त ५०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारी सूट मिळवण्यासाठी आजच व्यवहार पूर्ण करा.
२. पॅन कार्ड अपडेट आणि आधार लिंकपॅन कार्डशी संबंधित नियमात १ एप्रिलपासून मोठा बदल होत आहे.आजचा नियम: आज ३१ मार्चपर्यंत तुम्ही केवळ आधार कार्डच्या आधारे नवीन पॅनसाठी अर्ज करू शकता किंवा अपडेट करू शकता.उद्याचा बदल: १ एप्रिलपासून पॅनसाठी जन्म दाखला, १० वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र यांसारखी अतिरिक्त कागदपत्रे अनिवार्य होतील.
३. 'अपडेटेड आयटीआर' साठी शेवटचा दिवसजर तुमच्या मागील वर्षांच्या आयटीआरमध्ये काही चूक झाली असेल किंवा तुम्ही परतावा भरला नसेल, तर Updated Return (ITR-U) भरण्यासाठी आजची अंतिम तारीख आहे. आज ही संधी हुकल्यास तुम्हाला दंड सोसावा लागू शकतो किंवा नोटीस येऊ शकते.
४. गुंतवणुकीचे पुरावे जमा करापगारदार वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या एम्प्लॉयरला (नियोक्ता) गुंतवणुकीचे सर्व पुरावे जसे की घरभाडे पावती, होम लोन व्याजाचे प्रमाणपत्र आणि विम्याच्या पावत्या आजच सादर करा. जर पुरावे दिले नाहीत, तर एप्रिलच्या पगारातून जास्त टीडीएस कापला जाण्याची भीती आहे.
वाचा - उद्योगांपासून वैयक्तिक गरजांपर्यंत... 'उधारी'वर चाललीये अर्थव्यवस्था? RBI ची धक्कादायक आकडेवारी
५. खात्यांची पडताळणी आणि 'टॅक्स लॉस हार्वेस्टिंग'
- AIS आणि Form 26AS : तुमचे वार्षिक माहिती पत्रक तपासा. त्यात काही त्रुटी असल्यास आजच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.
- टॅक्स लॉस हार्वेस्टिंग: शेअर बाजारात नफा झाला असेल, तर तोट्यातील शेअर्स विकून तुम्ही तुमचा टॅक्स लायबिलिटी कमी करू शकता.
- किमान गुंतवणूक: पीपीएफ, सुकन्या समृद्धी किंवा एनपीएस खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान रक्कम आजच जमा करा.
Web Summary : Complete tax planning, investments, PAN-Aadhaar linking, ITR updates, and submit investment proofs by today to avoid penalties under revised tax rules starting tomorrow. Verify AIS, Form 26AS, and make minimum investments.
Web Summary : कल से शुरू होने वाले संशोधित कर नियमों के तहत दंड से बचने के लिए आज ही कर योजना, निवेश, पैन-आधार लिंकिंग, आईटीआर अपडेट पूरा करें और निवेश प्रमाण जमा करें। एआईएस, फॉर्म 26एएस सत्यापित करें और न्यूनतम निवेश करें।