Income Tax System : भारतीय प्राप्तिकर प्रणालीत आतापर्यंत व्यक्तीला एक स्वतंत्र घटक मानले जाते. लग्न झाले असले तरी पती आणि पत्नीला आपापले टॅक्स रिटर्न स्वतंत्रपणे भरावे लागतात. मात्र, आगामी अर्थसंकल्पापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट्सची सर्वोच्च संस्था असलेल्या ICAI ने सरकारला एक क्रांतिकारी प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, विवाहित जोडप्यांना आता 'जॉइंट टॅक्स रिटर्न' फाईल करण्याचा पर्याय मिळू शकतो, ज्यामुळे अनेक कुटुंबांचा टॅक्स वाचण्याची शक्यता आहे.
काय आहे हा नवीन प्रस्ताव?सध्याच्या नियमानुसार, घरचा खर्च आणि गुंतवणूक एकत्रित असली तरी टॅक्सचे हिशोब वेगळे असतात. ICAI च्या प्रस्तावानुसार, विवाहित जोडप्यांना दोन पर्याय मिळतील.
- सध्याच्या पद्धतीप्रमाणे स्वतंत्र टॅक्स भरणे.
- पती-पत्नीची कमाई एकत्र करून 'जॉइंट टॅक्स रिटर्न' भरणे.
या पद्धतीमध्ये दोघांकडे स्वतंत्र पॅन कार्ड असणे अनिवार्य असेल, परंतु त्यांच्या एकत्रित उत्पन्नावर नवीन टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जाईल.
कसे असेल टॅक्सचे गणित?जॉइंट टॅक्स सिस्टममध्ये 'बेसिक एक्झम्प्शन लिमिट' म्हणजेच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुप्पट केली जाऊ शकते. घांचे मिळून ८ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असू शकते. ३० टक्क्यांचा सर्वोच्च टॅक्स स्लॅब ४८ लाख रुपयांच्या पुढील उत्पन्नावर लागू केला जाऊ शकतो. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.
कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
- सिंगल इनकम फॅमिली : ज्या घरात फक्त पती किंवा फक्त पत्नी कमावती आहे, तिथे दुसऱ्या जोडीदाराची टॅक्स सवलत वाया जाते. जॉइंट टॅक्समध्ये ही सवलत वापरता येईल.
- कमी उत्पन्न असणारे जोडीदार : जर एका जोडीदाराचे उत्पन्न खूप जास्त आणि दुसऱ्याचे खूप कमी असेल, तर एकत्रित उत्पन्नामुळे ते कमी टॅक्स स्लॅबमध्ये येऊ शकतात.
- गुंतवणुकीचा लाभ : होम लोन, हेल्थ इन्शुरन्स आणि कलम ८०सी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीचा या जोडप्यांना अधिक प्रभावीपणे वापर करता येईल.
सर्वांसाठीच हा पर्याय फायदेशीर नसेलहा प्रस्ताव आकर्षक वाटत असला तरी तो सर्वांसाठी फायदेशीर नसेल. जर पती आणि पत्नी दोघांचेही उत्पन्न खूप जास्त असेल, तर त्यांचे एकत्रित उत्पन्न 'सरचार्ज' किंवा अतिउच्च टॅक्स स्लॅबमध्ये जाऊ शकते. अशा वेळी त्यांना स्वतंत्रपणे टॅक्स भरणेच परवडणारे ठरेल.
Web Summary : ICAI proposes joint tax returns for couples, potentially reducing tax burdens. Couples could choose joint filing with a doubled tax exemption limit, benefiting single-income or lower-earning families. However, high-income couples might find separate filing more advantageous.
Web Summary : ICAI ने दंपतियों के लिए संयुक्त टैक्स रिटर्न का प्रस्ताव रखा है, जिससे कर का बोझ कम हो सकता है। युगल दोहरी कर छूट सीमा के साथ संयुक्त फाइलिंग चुन सकते हैं, जिससे एकल आय या कम आय वाले परिवारों को लाभ होगा। उच्च आय वाले जोड़ों को अलग फाइलिंग अधिक फायदेमंद लग सकती है।