Join us

ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 14:54 IST

ITR Filing 2025: करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाने काही टीप्स दिल्या आहेत.

ITR Filing 2025 : इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्याकरदात्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरवरून वाढवून १६ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. आज रात्री ११:५९ पर्यंत करदाते आपले रिटर्न दाखल करू शकतील. तांत्रिक अडचणींमुळे अनेकजण वेळेत आयटीआर भरू शकले नाही. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी मानली जात आहे. यासोबत प्राप्तीकर विभागाने करदात्यांना काही टीप्स दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ई-फायलिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढल्याने अनेक करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागला. ओटीपी मिळायला उशीर होणे, लॉगिन फेल होणे आणि सबमिशन एरर येणे अशा समस्यांमुळे अनेक जण त्रस्त होते. या अडचणी लक्षात घेऊन इन्कम टॅक्स विभागाने काही सोप्या टिप्स जारी केल्या आहेत, ज्यामुळे यूजर्स वेळेत आपले रिटर्न दाखल करू शकतील.

रिटर्न भरताना अडचणी येत असतील तर काय कराल?इन्कम टॅक्स विभागाने स्पष्ट केले आहे की, अनेक अडचणी पोर्टलच्या नसून वापरकर्त्यांच्या लोकल सिस्टिम आणि ब्राउझर सेटिंग्जमुळे येतात. त्या दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा.

  1. तात्पुरत्या फाइल्स काढा: तुमच्या कॉम्प्युटरमधून `temp` आणि `%temp%` या तात्पुरत्या फाइल्स डिलीट करा.
  2. कॅशे आणि कुकीज साफ करा: ब्राउझरचा कॅशे आणि कुकीज नियमितपणे साफ करा.
  3. सपोर्टेड ब्राउझर वापरा: नेहमी लेटेस्ट क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एजसारखे अपडेटेड ब्राउझर वापरा.
  4. इनकॉग्निटो मोडमध्ये लॉगिन करा: ब्राउझरचा 'इनकॉग्निटो' किंवा 'प्रायव्हेट' मोड वापरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करा.
  5. एक्सटेंशन बंद करा: ॲड-ब्लॉकर किंवा इतर प्रायव्हसी एक्सटेंशन तात्पुरते बंद करा.
  6. वेगळे नेटवर्क वापरा: जर तुमच्या सध्याच्या इंटरनेटमध्ये समस्या येत असेल, तर दुसरा नेटवर्क किंवा मोबाइल हॉटस्पॉट वापरून पहा.

शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नकाटॅक्स तज्ञांनी सांगितले आहे की, शेवटच्या क्षणाची वाट पाहणे धोकादायक ठरू शकते. रात्री १२ च्या आधी पोर्टलवरील ट्रॅफिक आणखी वाढते, ज्यामुळे लॉगिन आणि सबमिशनमध्ये अडचण येऊ शकते. लवकर रिटर्न भरल्याने एररचा धोका कमी होतो आणि ई-व्हेरिफिकेशनसाठी पुरेसा वेळ मिळतो.

 

 

तुम्हाला अजूनही समस्या येत असेल, तर तुम्ही पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अधिकृत हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. करदात्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी शेवटच्या मिनिटाची वाट न पाहता वेळेत ई-फायलिंग आणि ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाकर