Join us

फायनान्सशी संबंधित 'या' गोष्टींसाठी ३१ डिसेंबर शेवटची संधी; जर प्रलंबित असेल तर आत्ताच करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:59 IST

financial deadline : तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत उशीरा आयटीआर दाखल करू शकता. याशिवाय तुम्ही निवडक बँकांच्या विशेष एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता.

financial deadline : २०२४ वर्ष संपायला अवघे ६ दिवस शिल्लक आहेत. या वर्षीची अनेक प्रलंबित कामे उरकण्याची घाई तुम्हाला असेल. मात्र, या गडबडीत तुमच्या फायनान्सशी संबंधित सर्व कामे पूर्ण केली आहेत ना? याची खात्री करा. कारण, काही आर्थिक कामांसाठी अद्याप ३१ डिसेंबरची मुदत आहे. तुमची प्रलंबित कामे तुम्ही पुढील ६ दिवसांत पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला आयटीआर उशीरा भरण्याचीही संधी आहे. याशिवाय बँकांच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदतही ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

ITR दाखल करण्याची अंतिम मुदतजर कोणत्याही आयकरदात्याने २०२३-२४ (FY 24) आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची तारीख ३१ जुलै चुकवली असेल तर ITR दाखल करण्याची तुमच्याकडे शेवटची संधी आहे. जे लोक ३१ जुलै रोजी ITR दाखल करू शकले नाहीत, ते निश्चित दंड रकमेसह ३१ डिसेंबरपर्यंत उशीरा ITR दाखल करू शकतात. लक्षात ठेवा, आयकर उशिरा भरणाऱ्याला ५,००० रुपये दंड जमा करावा लागतो. एकूण वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असल्यास, उशीरा दंडाची रक्कम १००० रुपये आहे.

IDBI बँक उत्सव FDतुम्ही आकर्षक व्याजदर ७.८५% पर्यंत परतावा मिळवण्यासाठी IDBI बँकेच्या विशेष उत्सव FD योजनेत गुंतवणूक करू शकता. उत्सव एफडी योजना ३१ डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. या FD योजनेंतर्गत सामान्य लोकांना ३०० दिवस, ३७५ दिवस, ४४४ दिवस आणि ७०० दिवसांच्या कालावधीसाठी अनुक्रमे ७.०५%, ७.२५%, ७.३५% आणि ७.२०% व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर दिले जात आहेत.

पंजाब आणि सिंध बँकेची विशेष एफडीपंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडी योजनेअंतर्गत, कोणताही गुंतवणूकदार ७.४५% पर्यंत व्याजदराने पैसे गुंतवू शकतो. बँक ३३३ दिवसांच्या कालावधीसाठी FD वर ७.२०% परतावा देते. लोकांना ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी ७.३% व्याज मिळेल. ५५५ दिवसांच्या (कॉलेबल) ठेवींसाठी, बँक ७.४५% व्याज दर देते. ७७७ दिवसांच्या विशेष ठेवींवर, लोक ७.२५% व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. सध्याचे दर ३१ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी वैध असतील. 

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयकरबँकिंग क्षेत्र