Join us
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:20 IST

Rules Changes From 1st April 2026: सरकार आणि बँकांनी संयुक्तपणे अनेक नियमांमध्ये बदल लागू केले आहेत, जे १ एप्रिल २०२६ पासून अंमलात येतील. तुमच्या आर्थिक स्थितीवर सर्वाधिक परिणाम करू शकणाऱ्या अशा १० प्रमुख नियमांवर एक नजर टाकूया.

Rules Changes From 1st April : देशात १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, त्यासोबतच तुमच्या कमाई आणि खर्चाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. आयकर कायद्यातील बदलांपासून ते टॅक्सी आणि विमान प्रवासापर्यंतच्या या १० मोठ्या बदलांची माहिती असणे प्रत्येक करदात्यासाठी आणि ग्राहकासाठी अनिवार्य आहे.

१. पॅन कार्डसाठी आता फक्त 'आधार' पुरेसे नाहीनवीन पॅन कार्ड काढताना आता केवळ आधार कार्ड देऊन चालणार नाही. ओळखीचा पुरावा म्हणून आता जन्म दाखला, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांपैकी एक अतिरिक्त दस्तऐवज देणे अनिवार्य आहे. तसेच, पॅन कार्डवर आता आधार डेटाबेसमध्ये असलेलेच नाव छापले जाईल.

२. 'इन्कम टॅक्स ॲक्ट २०२५' लागूदशकांपासून चालत आलेला 'आयकर कायदा १९६१' आता इतिहास जमा झाला असून, त्याऐवजी 'इन्कम टॅक्स ॲक्ट २०२५' लागू झाला आहे. नवीन कायद्यात पगारदार कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून, करमुक्तीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या निव्वळ पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

३. FASTag प्रवास महागलाहायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी NHAI ने वार्षिक पासच्या दरात वाढ केली आहे. फास्टॅगचा वार्षिक पास आता ३,००० रुपयांऐवजी ३,०७५ रुपयांना मिळणार आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.

४. ATM मधून पैसे काढणे पडणार महागHDFC बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँक यांसारख्या मोठ्या बँकांनी एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या नियमात बदल केला आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर लागणारे शुल्क आणि दैनंदिन मर्यादेत बदल करण्यात आले आहेत.

५. RuPay कार्डधारकांची 'लॉन्ज' सुविधा बंदRuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकांसाठी ही वाईट बातमी आहे. NPCI च्या नवीन परिपत्रकानुसार, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरील मोफत 'व्हीआयपी लॉन्ज' प्रवेशाची सुविधा आता मागे घेण्यात आली आहे.

६. परदेशवारी स्वस्त; TCS मध्ये मोठी कपातआंतरराष्ट्रीय टूर पॅकेज बुक करणाऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी १० लाख रुपयांवरील पॅकेजवर २०% टीसीएस भरावा लागत होता, तो आता सरसकट २% करण्यात आला आहे. यामुळे परदेश प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.

७. सॉव्हरेन गोल्ड बाँड आता करपात्रसोन्यातील गुंतवणुकीचे नियम कडक झाले आहेत. जर तुम्ही दुय्यम बाजारातून SGB खरेदी केले असतील, तर मुदतपूर्तीनंतर तुम्हाला १२.५% दराने 'लाँग टर्म कॅपिटल गेन' टॅक्स भरावा लागेल. केवळ मूळ गुंतवणूकदारांनाच करमुक्तीचा लाभ मिळेल.

८. SBI रिवॉर्ड पॉइंट्सवर 'लॉक'SBI च्या कॅशबॅक कार्डधारकांना आता त्यांचे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्यासाठी किमान ४,००० पॉइंट्स जमा करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी पॉइंट्स असल्यास ते स्टेटमेंट क्रेडिटसाठी वापरता येणार नाहीत.

९. 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' अनिवार्यडिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने सर्व डिजिटल पेमेंटसाठी 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' अनिवार्य केले आहे. यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी सुरक्षिततेचा एक अतिरिक्त स्तर पार करावा लागेल.

वाचा- वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?

१०. HDFC बँकेचे नवीन दर आणि शुल्कदेशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने त्यांचे कर्ज दर, मुदत ठेव व्याजदर आणि लॉकर शुल्कात बदल केले आहेत. १ एप्रिलपासून हे सर्व नवीन दर प्रभावी झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pocket Empty or Full? Ten Key Changes Impacting Your Budget!

Web Summary : New financial year brings changes affecting income and expenses. PAN card rules, income tax, FASTag, ATM charges, RuPay benefits, foreign travel TCS, gold bonds, SBI rewards, digital authentication, and HDFC rates are revised.
टॅग्स :इन्कम टॅक्सआयकर मर्यादामुख्य आयकर आयुक्त कार्यालयकर