Join us

लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:00 IST

Marriage Loan : आजकाल, सामान्य लग्नाचे बजेट ५ लाखांपासून सुरू होऊन २० लाखांपर्यंत पोहोचते. परंतु, डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला तर हा खर्च १ कोटीपर्यंतही जाऊ शकतो.

Marriage Loan : भारतात लग्न म्हणजे फक्त २ जीवांचं मिलन नाही, तर ते दोन कुटुंबांसाठी एक मोठा सण आणि अभिमानाचा क्षण असतो. डोळे दिपवणारे भव्य मंडप, आकर्षक थीम सजावट, परदेशी वाटणारे डेस्टिनेशन वेडिंग्स, नववधूची रॉयल एन्ट्री आणि जिभेचे चोचले पुरवणारे चविष्ट पदार्थ... प्रत्येक गोष्टीत 'परफेक्शन' आणि 'ग्रँडनेस' अपेक्षित असतो. पण या प्रत्येक 'परफेक्शन'मागे एक मोठी किंमत दडलेली असते, ज्यामुळे लग्नाचा खर्च गगनाला भिडत आहे. वेडमीगुडच्या (WedMeGood) ताज्या अहवालानुसार, २०२४ मध्ये केवळ ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ४८ लाखांहून अधिक लग्नं झाली, ज्यातून भारतीय विवाह उद्योगाने तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. हा आकडाच दाखवतो की भारतीय लग्नसराई किती मोठी आणि खर्चिक झाली आहे!

लग्नाचा खर्च किती वाढलाय?आजकाल एका सामान्य लग्नाचं बजेट ५ लाखांपासून २० लाखांपर्यंत सहज जातं, तर डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च १ कोटीपर्यंतही पोहोचू शकतो. २०२४ मध्ये लग्नावरील सरासरी खर्च ३६.५ लाख रुपये नोंदवला गेला, जो २०२३ पेक्षा ७ टक्के जास्त आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी तर हा आकडा ५१ लाखांपर्यंत गेला आहे. वाढती महागाई आणि स्थळ, केटरिंगसारख्या सेवांचे वाढलेले दर यामुळे हा खर्च दरवर्षी वेगाने वाढत आहे.

लग्नासाठी 'वेडिंग लोन' ठरू शकतं आधारजेव्हा लग्नाचा खर्च इतका वाढतो की बचतीतून तो पूर्ण करणं कठीण होतं, तेव्हा लोक 'विवाह कर्ज' किंवा 'वेडिंग लोन'चा विचार करतात. हे एक प्रकारचं पर्सनल लोनच (Personal Loan) आहे, जे खास लग्नाशी संबंधित खर्चांसाठी घेतलं जातं. लग्नाचं ठिकाण, सजावट, कपडे, फोटोग्राफी, वधूची एन्ट्री किंवा पाहुण्यांचं राहणं अशा सर्व गोष्टी या कर्जातून सहज करता येतात.

कर्ज मिळवणं झालंय सोपंआजच्या डिजिटल युगात कर्ज घेणं पूर्वीसारखं किचकट राहिलेलं नाही. आता लग्नाचं कर्ज काही क्लिक्समध्ये मिळू शकतं. यासाठी जास्त कागदपत्रं लागत नाहीत; फक्त तुमचे काही मूळ तपशील (basic details) भरा, केवायसी (KYC) पूर्ण करा आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआय प्लॅन (EMI Plan) निवडा. काही मिनिटांत पैसे थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. विशेष म्हणजे, १५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज वार्षिक १२% इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध आहे, तेही कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय.

तुम्हाला लग्न कर्ज मिळू शकतं का?भारतात विवाह कर्जासाठी अर्ज करणारा व्यक्ती २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान आणि भारतीय नागरिक असावा लागतो. नोकरी असो किंवा व्यवसाय, उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असणं आवश्यक आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) ७५० किंवा त्याहून अधिक असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता वाढते आणि व्याजदरही चांगले मिळतात. एचडीएफसीसारख्या काही बँका त्यांच्या पगार खातेधारकांना त्वरित कर्ज सुविधा देतात.

व्याजदर आणि कालावधीभारतात लग्न कर्जावरील व्याजदर तुमच्या उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि बँकेच्या अटींवर अवलंबून दरवर्षी १० टक्के ते २४ टक्के असू शकतात. सहसा कर्जाचा कालावधी १२ महिने ते ६० महिन्यांपर्यंत असतो, ज्यामुळे तुम्हाला हप्त्यांमध्ये लवचिकता मिळते.

वाचा - मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

कर्ज घ्यावं की नाही?विवाह कर्ज गरजेच्या वेळी आर्थिक भार कमी करण्यास मदत करत असलं तरी, ती एक आर्थिक जबाबदारी आहे. त्यामुळे, तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच कर्ज घ्या आणि ते वेळेवर परतफेड करा. वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करून आणि तुमच्या उत्पन्नानुसार सोयीस्कर ईएमआय प्लॅन निवडून योग्य पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे.

टॅग्स :लग्नबँकिंग क्षेत्रबँक