Join us

१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:45 IST

Home Loan EMI and Interest: आजच्या काळात बहुतांश लोक गृहकर्ज घेऊन प्रॉपर्टी खरेदी करतात. गृहकर्जाची रक्कम बहुधा मोठी असते, त्यामुळे परतफेडीचा कालावधीही 30 वर्षांपर्यंत असू शकतो. पाहा किती व्याजासकट किती रक्कम फेडता.

Home Loan EMI and Interest: आजच्या काळात बहुतांश लोक गृहकर्ज घेऊन प्रॉपर्टी खरेदी करतात. गृहकर्जाची रक्कम बहुधा मोठी असते, त्यामुळे परतफेडीचा कालावधीही 30 वर्षांपर्यंत असू शकतो. कर्ज जितकं जास्त असेल तितका ईएमआय कमी होतो. ज्यांना ईएमआय म्हणून मोठी रक्कम भरणं परवडत नाही असे बरेच लोक बहुतेक दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी तुम्हाला किती व्याज भरावे लागतं? जर तुम्ही एसबीआयकडून 15, 20, 25 आणि 30 वर्षांसाठी 30 लाखांचे गृहकर्ज घेतलं तर तुमचा ईएमआय किती असेल आणि तुम्हाला किती व्याज भरावं लागेल हे इथल्या हिशोबावरून समजून घेऊ. 

15 वर्षांसाठी कर्ज घेतल्यावर 

जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतले तर 9.55% व्याजदरानं ईएमआय 28,062 रुपये होईल. 20 वर्षात तुम्हाला व्याज म्हणून 37,34,871 रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला मूळ रक्कम आणि व्याज मिळून एकूण 67,34,871 रुपये भरावे लागतील, जे कर्जाच्या रकमेच्या दुप्पट आहे. 

25 वर्षांसाठी किती व्याज 

जर तुम्ही 25 वर्षांसाठी 30,00,000 रुपयांचं कर्ज घेतलं तर ईएमआय कमी होईल, परंतु व्याज वाढेल. यामध्ये तुम्हाला 9.55% व्याजदरानुसार दरमहा 26,315 रुपये ईएमआय आणि व्याज म्हणून 48,94,574 रुपये द्यावे लागतील. मूळ रक्कम व व्याज मिळून एकूण 78 लाख 94 हजार 574 रुपये भरावे लागतील.

 

जाणून घ्या 30 वर्षांच्या कर्जाचा हिशोब

 

30 वर्षांसाठी 30,00,000 रुपयांचे कर्ज घेतल्यास ईएमआय 25,335 रुपयांवर येईल. पण 9.55 टक्के व्याजानुसार 30 वर्षांत 61 लाख 20 हजार 651 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहे. यामध्ये मूळ रक्कमही जोडली तर तुम्ही 30 वर्षांत एकूण 91,20,651 रुपये परत कराल, जे तुमच्या कर्जाच्या रकमेच्या तिप्पट असेल. 

व्याजाचा बोजा कसा कमी करता येईल? 

व्याजाचा हा बोजा कमी करायचा असेल तर पहिला प्रयत्न म्हणजे बँकेकडून किमान कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. कर्जाची रक्कम तितकीच घ्या जितकी तुम्ही कमी कालावधीत परत करू शकता. कमी कालावधीत तुम्हाला ईएमआय जास्त भरावा लागला तरी बँकेला अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत. याशिवाय कर्ज लवकर फेडण्याचा करण्याचा प्रयत्न करा. यालाच प्री-पेमेंट असंही म्हणतात.  

यामाध्यमातून कर्जाची लवकर परतफेड होण्यास मदत होते, तसेच लाखो रुपयांच्या व्याजाची बचत होऊ शकते. प्रीपेमेंटची रक्कम आपल्या मुद्दलातून वजा केली जाते. यामुळे तुमची मूळ रक्कम कमी होते आणि तुमच्या ईएमआयवरही परिणाम होतो. यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अधिक पैसे मिळतील गृहकर्जाच्या खात्यात जमा करत राहणं उत्तम ठरू शकतं.

टॅग्स :बँकपैसाएसबीआय