भारतीय गुंतवणूकदारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा आजही एक सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. जर आपणही आपल्या बचतीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आकर्षक व्याजदर देत आहेत. काही बँका तर सामान्य ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9% पर्यंत व्याज देत आहेत. तर जाणून घेऊयात, सर्वाधिक व्याज देणाऱ्या 10 बँकांच्या एफडी दरांसंदर्भात...
एसबीएम देतेय 8.75% व्याज - एसबीएम बँक ही 3 वर्षे 2 दिवस ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 8.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75% व्याज देत आहे. बंधन बँक 600 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 8% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज देत आहे. डीसीबी बँक 36 महिन्यांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 8% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज देते. डॉयचे बँक 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर दोन्ही गटांना 7.75% व्याज देते.
याशिवाय, यस बँक 18 ते 36 महिन्यांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25% व्याज देते. आरबीएल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक 24 ते 36 महिन्यांच्या आणि 1 वर्ष 1 दिवस ते 550 दिवसांच्या एफडीवर अनुक्रमे 7.50% आणि 8% व्याज देत आहेत. इंडसइंड बँक 2 वर्ष 9 महिने ते 3 वर्ष 3 महिन्यांच्या एफडीवर, तर एचएसबीसी बँक 732 दिवस ते 36 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याज देत आहे. याशिवाय, करूर वैश्य बँकही 444 दिवसांच्या एफडीवर आपल्या सामान्य ग्राहकांना 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याज देत आहे.
(टीप - हा गुंतवणुकीचा सल्ला नाह. पण या आकर्षक व्याजदरांमुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित परताव्याची संधी आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेची विश्वासार्हता आणि अटी तपासणेही तेवढेच आवश्यक आहे.
Web Summary : Looking for safe FD investments? Several banks offer high interest rates, up to 9% for senior citizens. SBM Bank leads with 8.75%.
Web Summary : सुरक्षित FD निवेश की तलाश है? कई बैंक वरिष्ठ नागरिकों के लिए 9% तक उच्च ब्याज दरें प्रदान करते हैं। एसबीएम बैंक 8.75% के साथ सबसे आगे है।