Join us

UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 11:56 IST

upi payments fraud : यूपीआय पेमेंट करताना आता बनावट स्क्रीनशॉट दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत.

upi payments fraud : यूपीआय पेमेंटमुळे आर्थिक व्यवहाराचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. भाजीबाजारापासून शेअर बाजारापर्यंत सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. पण, अलीकडच्या काळात बनावट पेमेंट स्क्रीनशॉटमुळे लोकांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तुम्ही देखील आर्थिक व्यवहारांसाठी युपीआ पेमेंट्सचा वापर करत असाल तर तुम्हाला या गोष्टींची माहिती असायला हवी. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

कसा करतात फ्रॉड?यामध्ये पेमेंट करणारी व्यक्ती तुम्हाला UPI द्वारे केलेल्या पेमेंटचा बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवतात. तुम्हाला वाटतं आपल्याला पैसे मिळाले. पण, असं होत नाही. प्रत्यक्षात तुमच्या खात्यात पैसे आलेले नसतात. अशी फसवणूक तुम्ही टाळू शकता. यासाठी सोप्या टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

वाचा - 'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी

  • कोणतेही उत्पादन किंवा सेवा देण्यापूर्वी नेहमीच तुमचे बँक खाते किंवा पेमेंट अॅप तपासा.
  • व्यवसाय UPI खाते प्रत्येक पेमेंटसाठी स्वयंचलित SMS सूचना पाठवते, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते.
  • पेमेंट कन्फर्मेशन मेसेज तपासा - पेमेंट कन्फर्मेशन एसएमएसची वाट पहा किंवा तुमच्या अॅपमध्ये व्यवहाराची स्थिती तपासा.
  • तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले QR कोड तुम्हाला पेमेंट्स अधिक सहजपणे ट्रॅक करण्यास मदत करतात.
  • फक्त स्क्रीनशॉटवर अवलंबून राहू नका. तुमच्या बँक किंवा UPI अॅपद्वारे नेहमी रिअल-टाइममध्ये व्यवहारांची पुष्टी करा.
  • पेमेंटची नोंद ठेवा. क्रोस चेक करण्यासाठी मिळालेल्या सर्व पेमेंटची एक नोटबुक किंवा डिजिटल रेकॉर्ड ठेवा.
  • संशयास्पद व्यवहारांची तक्रार करा. जर तुमच्यासोबत अशी काही घटना घडल्यास त्याची तक्रार पोलीस किंवा सायबर गुन्हे विभागाला करा. 
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकऑनलाइन