UPI Loan Without Interest :डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवणारे 'यूपीआय' आता क्रेडिट कार्डाच्या बाजारपेठेला थेट टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बँकांमध्ये सध्या एका महत्त्वपूर्ण बदलावर चर्चा सुरू असून, लवकरच यूपीआयवरून घेतलेल्या छोट्या कर्जावर ठराविक कालावधीसाठी शून्य व्याज आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य युजर्सना मोठा दिलासा मिळणार असून क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे.
व्याजाची भीती आता होणार दूरआतापर्यंत 'यूपीआय क्रेडिट लाईन' ही सुविधा क्रेडिट कार्डाच्या तुलनेत मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावरील व्याजाची आकारणी होती. क्रेडिट लाईन वापरताच पहिल्या दिवसापासून त्यावर व्याज आकारले जाण्याची शक्यता असायची. यामुळे आपत्कालीन स्थितीत पैसे उपलब्ध होऊनही, व्याजाच्या बोजामुळे ग्राहक ही सुविधा वापरण्यास कचरत होते. मात्र, आता हे चित्र बदलणार आहे.
नवा प्लॅन काय आहे?NPCI च्या नव्या धोरणानुसार, यूपीआय क्रेडिट लाईनला देखील क्रेडिट कार्डाप्रमाणे 'ग्रेस पिरीयड' दिला जाणार आहे. तुम्ही क्रेडिट लाईनमधून पैसे खर्च केल्यास, बिल जनरेट होण्याच्या तारखेपर्यंत त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. जर ग्राहकाने बिल भरण्याच्या तारखेपूर्वी वापरलेल्या रकमेचा भरणा केला, तर त्याला एकही रुपया अतिरिक्त द्यावा लागणार नाही.
वाचा - रिटर्नच्या मागे धावू नका, जोखीम ओळखा! अल्फा, बीटा आणि शार्प रेशो तपासून करा गुंतवणूक
या बँकांनी उचलले पहिले पाऊलकाही बँकांनी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू देखील केली आहे, ज्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. येस बँक आपल्या यूपीआय क्रेडिट लाईनवर तब्बल ४५ दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकही आपल्या ग्राहकांना ३० दिवसांचा व्याजमुक्त अवधी उपलब्ध करून देत आहे. ही सुरुवात असून, आगामी काळात देशातील इतर मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी बँका देखील हा 'क्रेडिट कार्ड मॉडेल' अवलंबण्याची दाट शक्यता आहे.
Web Summary : UPI is set to rival credit cards by offering interest-free loans for a limited period. NPCI is discussing zero interest on small UPI loans, providing relief to users. Some banks already offer 30-45 day interest-free periods.
Web Summary : UPI क्रेडिट कार्ड को टक्कर देने के लिए तैयार है, सीमित समय के लिए ब्याज मुक्त ऋण की पेशकश। NPCI छोटे UPI ऋणों पर शून्य ब्याज पर चर्चा कर रहा है, जिससे उपयोगकर्ताओं को राहत मिलेगी। कुछ बैंक पहले से ही 30-45 दिनों की ब्याज मुक्त अवधि प्रदान करते हैं।