Join us
Daily Top 2Weekly Top 5

FD वर 'या' बँका देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा कोणत्या बँक आहेत यादीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 13:24 IST

वाचा कोणत्या आहेत या बँका आणि किती देतायत व्याज.

Fixed Deposite Interest Rates : काही बँका मुदत ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्क्यांपासून पुढे व्याजदर देत आहेत. स्मॉल फायनान्स बँकांच्या (SFB) तुलनेत खाजगी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अधिक व्याजदर ऑफर करण्यात खूप मागे आहेत. आज आपण अशा बँकांबद्दल जाणून घेऊ ज्या ज्येष्ठ नागरिकांना फिक्स्ड डिपॉझिटवर 9 टक्के आणि त्याहून अधिक व्याज देत आहेत.

युनिटी स्मॉल फायनॅन्स बँकयुनिटी स्मॉल फायनान्स बँक (SFB) फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य नागरिकांसाठी 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. बँक 1001 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 9.50 टक्के व्याजदर देते. बँकेनं 14 जून 2023 पासून सुधारित व्याजदर लागू केले आहेत. फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटमधील पैसे वेळेपूर्वी काढल्यास 1 टक्के दरानं दंड आकारला जाईल.

जन स्मॉल फायनॅन्स बँकजनत स्मॉल फायनान्स बँक 366 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 9 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

फिनकेअर स्मॉल फायनॅन्स बँकफिनकेअर स्मॉल फायनॅन्स बँकेनं एफडीवरील व्याजदर 9.11 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. बँक एफडीवर सर्वसामान्यांना 3 टक्के ते 8.51 टक्के व्याजदर देत आहे. 1000 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.11 टक्के व्याजदर दिला जात आहे. हे नवीन दर 25 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँकज्येष्ठ नागरिकांसाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 444 दिवसांच्या ठेवी आणि 888 दिवसांच्या कालावधीसाठी 9 टक्के व्याज दर देत आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी 8.50 टक्के व्याजदर दिला जातो. हे दर 5 जून 2023 पासून लागू झाले आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बँकपैसागुंतवणूक