Join us

Student Personal Loan : कुठलेही उत्पन्न नसताना विद्यार्थी पर्सनल लोन घेऊ शकतात का? फक्त एक काम करावं लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:51 IST

Student Personal Loan : उत्पन्न नसतानाही विद्यार्थ्यांना वैयक्तिक कर्ज मिळू शकते. पण, पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोन हे वेगळे आहेत हे लक्षात ठेवा.

Student Personal Loan : नोकरदारांना पर्सनल लोन घेण्यासंदर्भात एकदाही फोन आला नाही, असा माणूस सापडणे शक्य नाही. गेल्या काही वर्षात वैयक्तित कर्ज घेण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या जमानन्यात कधी कोणाला पैशाची गरज पडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत कुठल्याही कागदत्रांशिवाय कर्ज मिळत असेल तर सोन्याहून पिवळं म्हणत लोकही त्याचा लाभ घेतात. मात्र, हे कर्ज सर्वांना उपलब्ध होते का? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना अचानक पैशाची गरज भासली तर असे कर्ज मिळते का? कारण, कोणतंही कर्ज देताना बँका तुमची ते फेडण्याची कुवत पाहतात. अशा स्थितीत देखील काही मार्ग वापरुन तुम्ही हे कर्ज मिळवू शकता.

पर्सनल लोन हे असे कर्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. तुम्ही ते वैद्यकीय खर्च, भाडे किंवा इतर गरजांसाठी वापरू शकता. गॅरेंटर किंवा अर्धवेळ कामाच्या मदतीने कमाई न करताही कर्ज घेणे शक्य आहे. पण, कर्ज घेण्यापूर्वी, सर्व अटी आणि फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे नियोजन केल्यास, ते आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.

विद्यार्थी कर्ज कसे घेऊ शकतात?तुमचे कोणतेही उत्पन्न नसले तरी तुम्ही कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचे आई-वडील किंवा काम करणाऱ्या भावंड किंवा मित्राची गॅरेंटर म्हणून आवश्यकता असेल. जामीनदार ही अशी व्यक्ती असते, जी कर्जासाठी जबाबदार असते. जर कर्जाची परतफेड करण्यात काही अडचण आल्यास कर्ज फेडण्यास जामीनदार जबाबदार असतो. याशिवाय जर तुम्ही पार्ट टाइम जॉब, फ्रीलान्सिंग किंवा इतर कोणत्याही कामातून पैसे कमवत असाल तर कर्ज मिळणे थोडे सोपे होऊ शकते.

उत्पन्नाशिवाय कर्ज कसे मिळवायचे?तुमचे कोणतेही स्थिर उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही कर्ज घेऊ शकता. परंतु, यासाठी तुमचे आई-वडील किंवा भावंडांना जामीनदार व्हावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा अर्धवेळ कामातून थोडेसे कमावत असाल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. या स्थितीत कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोन वेगळे आहेत. त्यांचे उपयोगही वेगळे आहेत. घरभाडे, वैद्यकीय बिले किंवा इतर कोणत्याही खर्चासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तर, शैक्षणिक कर्ज हे केवळ शिक्षणाशी संबंधित खर्चांसाठी आहे, जसे की शिक्षण शुल्क, पुस्तके आणि इतर अभ्यासक्रमाशी संबंधित खर्च.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रेकर्जासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे. पत्ता पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वीज बिल दिले जाऊ शकते. मिळकतीचा पुरावा म्हणून गॅरेंटरचे बँक स्टेटमेंट देखील आवश्यक आहे.

टॅग्स :विद्यार्थीबँकिंग क्षेत्रबँक