SBI ATM Charges : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम शुल्कात मोठी वाढ केली आहे. इंटरचेंज फी वाढल्याचे कारण देत बँकेने एटीएम आणि 'एडी डब्लूएम' मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे दर बदलले आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत सॅलरी अकाउंट धारकांना मिळणारी अमर्याद मोफत व्यवहारांची सवलत आता बँकेने काढून घेतली आहे. हे नवीन नियम १ डिसेंबर २०२५ पासूनच लागू करण्यात आले आहेत.
बँकेने नेमके काय बदल केले?जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि इतर बँकांच्या एटीएमचा वापर करत असाल, तर आता तुमच्या खिशाला जास्त कात्री लागणार आहे.१. बचत खातेधारकांसाठीइतर बँकांच्या एटीएमवरून दरमहा ५ मोफत व्यवहारांची मर्यादा कायम आहे. मात्र, ही मर्यादा संपल्यानंतर लागणारे शुल्क वाढवण्यात आले आहे.कॅश विड्रॉल (रोख रक्कम काढणे) : २१ रुपयांवरून आता २३ रुपये + GST मोजावे लागतील.नॉन-फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन (बॅलन्स चेक इ.) : १० रुपयांऐवजी आता ११ रुपये + GST लागतील.
२. सॅलरी अकाउंट धारकांना मोठा फटकाएसबीआयच्या सॅलरी अकाउंट धारकांसाठी आतापर्यंत इतर बँकांच्या एटीएमवर अमर्याद मोफत व्यवहार मिळत होते. मात्र, आता हे नियम बदलले आहेत.सॅलरी अकाउंटवर आता महिन्याला फक्त १० मोफत व्यवहार मिळतील.१० व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर, प्रत्येक रोख काढणीसाठी २३ रुपये आणि इतर व्यवहारांसाठी ११ रुपये (अधिक GST) शुल्क आकारले जाईल.
या ग्राहकांना कोणताही भुर्दंड नाही
- बँकेने काही सेवांवरील शुल्कात कोणताही बदल केलेला नाही, ज्यामुळे सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
- एसबीआय एटीएम : एसबीआयच्या स्वतःच्या एटीएमवर एसबीआयचे कार्ड वापरल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही.
- कार्डलेस विड्रॉल : एसबीआय एटीएममधून 'कार्डलेस' पैसे काढणे अजूनही अमर्याद आणि पूर्णपणे मोफत आहे.
- BSBD खाते : 'बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट' खातेधारकांसाठी असलेल्या एटीएम शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
वाचा - चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
बदल का करण्यात आले?रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकांना एकमेकांच्या एटीएम नेटवर्कचा वापर करण्यासाठी 'इंटरचेंज फी' द्यावी लागते. ही फी वाढल्यामुळे बँकांनी हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयपाठोपाठ इतर खासगी बँकाही लवकरच अशाच प्रकारची शुल्कवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : SBI has increased ATM charges, ending unlimited free transactions for salary accounts. While 5 free transactions remain for savings accounts, charges increase afterward. Salary accounts now get only 10 free transactions monthly. Cardless withdrawals and BSBD accounts remain unaffected.
Web Summary : एसबीआई ने एटीएम शुल्क में वृद्धि की है, वेतन खातों के लिए असीमित मुफ्त लेनदेन समाप्त कर दिया है। बचत खातों के लिए 5 मुफ्त लेनदेन बने रहेंगे, लेकिन उसके बाद शुल्क बढ़ जाएगा। वेतन खातों को अब केवल 10 मुफ्त लेनदेन मिलेंगे। कार्डलेस निकासी और बीएसबीडी खाते अप्रभावित रहेंगे।