Bank Locker Rules : तुम्ही देखील एखाद्या बँकेचे लॉकर भाड्याने घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दागिने आणि मौल्यवान कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉकरच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ग्राहकांना केवळ लॉकर भाड्याने घेऊन चालणार नाही, तर सुधारित लॉकर कराराचे पालन करणे आणि त्यात काय ठेवावे किंवा काय ठेवू नये, याबद्दलच्या नियमांची माहिती असणे अनिवार्य आहे.
लॉकरमध्ये नेमके काय ठेवावे?आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लॉकरचा वापर केवळ कायदेशीर आणि पूर्वनिर्धारित कारणांसाठीच करता येतो.
- दागिने: सोन्या-चांदीचे दागिने आणि हिरे.
- दस्तावेज : मालमत्तेची कागदपत्रे, कर्जाचे दस्तऐवज, विमा पॉलिसी, बचत रोखे.
- प्रमाणपत्रे : जन्म दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर गोपनीय कागदपत्रे.
बँक लॉकरमध्ये 'हे' ठेवण्यास सक्त मनाई!अनेकजण लॉकरमध्ये रोख रक्कम किंवा इतर वस्तू ठेवतात, मात्र आरबीआयने यावर स्पष्ट निर्बंध घातले आहेत.
- बँक लॉकरमध्ये रोख रक्कम किंवा चलन ठेवता येत नाही.
- शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके किंवा किरणोत्सर्गी पदार्थ.
- ड्रग्ज, अमली पदार्थ किंवा तस्करीचे सामान.
- नाशवंत वस्तू लॉकरमध्ये ठेवण्यास मनाई आहे.
लॉकरचे भाडे थकवले तर काय होईल?जर एखाद्या ग्राहकाने सलग तीन वर्षे लॉकरचे भाडे भरले नाही, तर बँकेला तो लॉकर तोडून उघडण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असणे बंधनकारक आहे. लॉकर उघडल्यानंतर त्यातील सामानाची सविस्तर यादी बँक तयार करते. ही संपूर्ण प्रक्रिया अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीत पार पडते. लॉकरमधील साहित्य ग्राहकाकडे सोपवताना त्या यादीवर ग्राहकाची लेखी स्वाक्षरी घेतली जाते, जेणेकरून भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये.
वाचा - श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड
सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानबँका आता लॉकर रूममध्ये २४×७ सीसीटीव्ही कॅमेरा, अलार्म प्रणाली आणि मर्यादित प्रवेश यांसारख्या आधुनिक सुरक्षा उपाययोजना राबवत आहेत. ग्राहकांनी आपला लॉकर करार वेळेत नूतनीकरण करावा आणि बँकेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरबीआयकडून करण्यात आले आहे.
Web Summary : RBI updates locker rules: store jewelry, documents, certificates. Cash, weapons, drugs, perishables prohibited. Unpaid rent for 3 years allows bank access. Banks enhance security with CCTV and alarms.
Web Summary : RBI ने लॉकर नियमों में बदलाव किए: गहने, दस्तावेज, प्रमाणपत्र रखें। नकद, हथियार, ड्रग्स, नाशपाती वस्तुएं वर्जित हैं। 3 साल तक किराया न देने पर बैंक को अधिकार। बैंक सीसीटीवी और अलार्म से सुरक्षा बढ़ाते हैं।