Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्सनल लोन की PPF लोन? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या कोणता पर्याय स्वस्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:30 IST

PPF vs Personal Loan: फक्त ८.१% व्याजावर मिळेल कर्ज;

PPF vs Personal Loan: अचानक पैशांची गरज भासल्यास बहुतांश लोक पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. मात्र पर्सनल लोनवर साधारण १२% ते १८% पर्यंत व्याजदर लागतो. त्याच्या तुलनेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खात्यावर आधारित कर्ज हा स्वस्त पर्याय ठरू शकतो. सध्या PPF वर ७.१% व्याजदर आहे. या खात्यावर कर्ज घेतल्यास फक्त १% अतिरिक्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे एकूण व्याजदर सुमारे ८.१% इतकेच लागेल.

CIBIL स्कोअरची गरज नाही

PPF खात्यावर घेतल्या जाणाऱ्या कर्जासाठी CIBIL स्कोअर तपासला जात नाही आणि जास्त कागदपत्रांचीही आवश्यकता नसते. कारण या कर्जाची हमी म्हणजे तुमच्या PPF खात्यातील जमा रक्कम असते. त्यामुळे बँक सहसा हे कर्ज देण्यास नकार देऊ शकत नाही, कारण हा गुंतवणूकदाराचा कायदेशीर हक्क मानला जातो. PPF ही गुंतवणूक योजना E-E-E (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीत येते. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम तिन्ही करमुक्त असतात.

PPF लोन कधी मिळते?

PPF खात्यावर कर्ज कोणत्याही वेळी उपलब्ध नसते. खाते उघडल्यानंतर पहिल्या वर्षानंतर ते पाचव्या वर्षापर्यंतच कर्ज घेण्याची संधी असते. उदाहरणार्थ, जर एखाद्याने २०२४ मध्ये PPF खाते उघडले, तर त्याला २०२५ ते २०३० दरम्यानच कर्ज घेता येईल. पाच वर्षांनंतर कर्ज मिळत नाही, त्याऐवजी Partial Withdrawal (आंशिक पैसे काढणे) हा पर्याय उपलब्ध राहतो. कर्जाची रक्कम PPF खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असते आणि वर्षातून एकदाच कर्ज घेता येते.

परतफेडीसाठी ३६ महिन्यांची मुदत

PPF कर्जाची परतफेड करण्यासाठी कमाल ३६ महिन्यांची (३ वर्षे) मुदत दिली जाते. प्रथम मूळ रक्कम परत करावी लागते. त्यानंतर व्याजाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये भरावी लागते. जर ३६ महिन्यांत कर्ज पूर्ण फेडले नाही, तर व्याजदर १% वरून थेट ६% पर्यंत वाढू शकतो आणि दंडही आकारला जाऊ शकतो.

PPF खात्याची इतर वैशिष्ट्ये

PPF खाते १५ वर्षांसाठी असते. मॅच्युरिटी नंतर ते ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते. खाते मॅच्युर झाल्यानंतरही शिल्लक रकमेवर व्याज मिळत राहते. तसेच सातव्या वर्षापासून आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होते आणि ही रक्कमही करमुक्त असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : PPF Loan vs Personal Loan: Which is better when borrowing?

Web Summary : Need funds? PPF loans offer lower interest (around 8.1%) than personal loans (12-18%). No CIBIL score is needed. Repayment within 36 months. PPF accounts offer tax benefits and partial withdrawal options after seven years.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रभविष्य निर्वाह निधीगुंतवणूक