Pay Later Service Paytm: देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वार (UPI) पेमेंट करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. जवळच्या भाजीपाल्याच्या दुकानापासून ते मॉलपर्यंत, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहजपणे UPI पेमेंट करू शकता. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या बँक खात्यात किंवा RuPay क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसले तरीही तुम्ही UPI पेमेंट करू शकता? तुम्ही निवडक बँकांनी जारी केलेल्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनमधून खर्च करू शकता आणि नंतर बँकेला ते पैसे परत करू शकता. या संदर्भात, डिजिटल पेमेंट कंपनी Paytm नं एक नवीन सेवा सुरू केली आहे. कंपनीनं सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या (SSFB) मदतीनं 'पोस्टपेड ऑन युपीआय' (Postpaid on UPI) नावाची एक नवीन सेवा सुरू केली आहे.
व्याजमुक्त क्रेडिटचा लाभ
पेटीएमच्या नवीन फीचरमुळे तुम्हाला ३० दिवसांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिटचा लाभ घेता येईल. सोप्या भाषेत सांगायचं तर, आता खरेदी केल्यानंतर, ३० दिवसांनी पेमेंट करावं लागेल. पेटीएम पोस्टपेडसह, ग्राहक कोणत्याही UPI QR कोड, ऑनलाइन शॉपिंग साइट्स किंवा पेटीएम अॅप सेवा जसे की मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट आणि तिकीट बुकिंगसाठी पेमेंट करू शकतील.
सुरुवातीला, ही सेवा फक्त निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, जे त्यांच्या खर्चाच्या पद्धतींनुसार निवडले जातात. येत्या काही महिन्यांत ही सेवा अधिक युजर्ससाठी विस्तारित केली जाईल.
कसा मिळेल Postpaid on UPI चा फायदा?
पेटीएमची पोस्टपेड ऑन यूपीआय सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना पेटीएम अॅपवर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.