Join us

UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:57 IST

UPI EMI: भारतातील डिजिटल पेमेंटची क्रांती आता पुढील टप्प्यावर पोहोचणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयवर ईएमआयचा (EMI) पर्याय आणण्याच्या तयारी आहे.

UPI EMI: भारतातील डिजिटल पेमेंटची क्रांती आता पुढील टप्प्यावर पोहोचणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयवर ईएमआयचा (EMI) पर्याय आणण्याच्या तयारी आहे. याचा अर्थ असा की, आता ग्राहक यूपीआयनं कोणतंही पेमेंट करताना, त्याच वेळी त्यांना ते ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळेल. रूपे क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट लाइन सारख्या सुविधांनंतर, हे नवीन फीचर यूपीआयला केवळ एक पेमेंट प्लॅटफॉर्म न राहता, एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टम बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. याचा फायदा फक्त ग्राहकांनाच होणार नाही तर फिनटेक कंपन्या आणि बँकांनाही नवीन महसुलाच्या संधी मिळतील.

एनपीसीआयच्या मते, नवीन व्हर्जनमध्ये ग्राहक जेव्हाही क्यूआर कोड स्कॅन करतील, तेव्हा त्यांना ईएमआयचा पर्याय मिळेल. हे अगदी कार्ड स्वाइप केल्यानंतर ईएमआय निवडण्यासारखंच असेल. सध्या फिनटेक कंपन्यांनी ही सुविधा सुरू केली नसली तरी, नियम तयार झाले आहेत आणि लवकरच याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी केली जाईल.

बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक

फिनटेक कंपन्यांना मोठी संधी मिळेल

नवी (Navi) आणि पेटीएम (Paytm) सारख्या कंपन्या आधीपासूनच बँकांसोबत मिळून क्रेडिट लाइन ऑफर करत आहेत. आता ईएमआयच्या फीचरमुळे त्यांचं बिझनेस मॉडेल आणखी मजबूत होईल. जिथे यूपीआय आणि रूपे डेबिट कार्डवर कोणताही शुल्क लागत नाही, तिथे क्रेडिट पेमेंटवर सुमारे १.५% इंटरचेंज फीस आकारली जाईल. यामुळे फिनटेक क्षेत्रासाठी कमाईचा नवीन मार्ग उघडेल.

डिजिटल पेमेंटचा चेहरा बदलेल क्रेडिट

पेययूचे (PayU) सीईओ अनिरबन मुखर्जी यांनी म्हटलंय की, यूपीआय आता केवळ पेमेंटचे साधन राहणार नाही, तर एक संपूर्ण पेमेंट प्रणाली (system) बनणार आहे. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता चेकआउट फायनान्सिंगचा फायदा घेता येईल. उद्योगाचे म्हणणं आहे की, लहान कर्ज आणि 'बाय-नाऊ-पे-लेटर' सारखे मॉडेल यूपीआयवर वेगानं लोकप्रिय होतील. मात्र, बँकर्सचे म्हणणं आहे की, लहान ग्राहक कर्जांमध्ये 'बॅड लोन'चा (बुडीत कर्ज) धोकाही राहील. अशा परिस्थितीत कर्जाची वाढ होईल, पण बँका ती सावधगिरीनं पुढे घेऊन जातील. सध्या यूपीआय दरमहा सुमारे २० अब्ज व्यवहार करतो आणि त्याचे २५-३० कोटी युजर्स आहेत. अशा स्थितीत ईएमआयचा पर्याय या नेटवर्कची ताकद अनेक पटींनी वाढवू शकतो.

टॅग्स :व्यवसायपैसा