Lowest Car Loan : स्वतःची हक्काची कार असावी, असं स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं असतं. मात्र, कारच्या किमती लाखांच्या घरात असल्याने संपूर्ण बचतीतून कार घेणं अनेकांसाठी कठीण जातं. अशा वेळी बँकांकडून मिळणारे 'वाहन कर्ज' हा एक मोठा आधार ठरतो. जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेत व्याजाचा दर सर्वात कमी आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण व्याजातील थोडासा फरकही तुमच्या 'ईएमआय'वर मोठा परिणाम करू शकतो.
१. कॅनरा बँकसरकारी बँकांमध्ये सध्या कॅनरा बँक सर्वात स्वस्त कार लोन ऑफर करत आहे. या बँकेचा सुरुवातीचा व्याजदर ७.७० टक्के इतका आहे. कमी व्याजदरामुळे ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
२. बँक ऑफ बडोदाबँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ८.१५ टक्क्यांपासून कार लोन उपलब्ध करून देत आहे. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला या दराचा फायदा घेता येईल.
३. आयसीआयसीआय बँकखासगी क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी ८.५० टक्क्यांच्या सुरुवाती दराने कार लोन देऊ करत आहे. बँकेची प्रक्रिया जलद असल्याने अनेक ग्राहक या पर्यायाला पसंती देतात.
४. एचडीएफसी बँकदेशातील सर्वात मोठी खासगी बँक, एचडीएफसी बँकेचे कार लोनचे दर ८.५५ टक्क्यांपासून सुरू होतात. तुमच्या कर्जाची रक्कम आणि पात्रतेनुसार या दरांमध्ये बदल होऊ शकतो.
५. स्टेट बँक ऑफ इंडियादेशातील सर्वात मोठी सरकारी बँक 'एसबीआय' आपल्या ग्राहकांना ८.७० टक्क्यांच्या व्याजदराने कार लोन ऑफर करत आहे. एसबीआयचे कर्ज वितरण पारदर्शक असल्याने ग्राहकांचा या बँकेवर मोठा विश्वास असतो.
बँकांचे व्याजदर
| बँकेचे नाव | सुरुवातीचा व्याजदर (अंदाजे) |
| कॅनरा बँक | ७.७०% |
| बँक ऑफ बडोदा | ८.१५% |
| आयसीआयसीआय बँक | ८.५०% |
| एचडीएफसी बँक | ८.५५% |
| स्टेट बँक ऑफ इंडिया | ८.७०% |
कर्ज घेण्यापूर्वी 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा
- सिबिल स्कोर : तुमचा सिबिल स्कोर ७५० पेक्षा जास्त असेल, तर बँका तुम्हाला सर्वात कमी व्याजदराने कर्ज देतात.
- प्रक्रिया शुल्क : केवळ व्याजदर न पाहता बँकेचे प्रोसेसिंग फी आणि इतर छुपा खर्च तपासा.
- पात्रता : तुमचं वय, उत्पन्न आणि सध्याची कर्जं यावर बँका तुमची कर्ज देण्याची मर्यादा ठरवतात.
Web Summary : Dreaming of a car? Banks offer loans, but interest rates vary. Canara Bank has the lowest rate at 7.70%. Check processing fees and your CIBIL score for the best deal. Compare offers from Bank of Baroda, ICICI, HDFC, and SBI.
Web Summary : कार का सपना? बैंक ऋण देते हैं, लेकिन ब्याज दरें अलग-अलग होती हैं। केनरा बैंक की दर सबसे कम 7.70% है। सर्वोत्तम सौदे के लिए प्रोसेसिंग शुल्क और अपना सिबिल स्कोर जांचें। बैंक ऑफ बड़ौदा, आईसीआईसीआई, एचडीएफसी और एसबीआई से ऑफ़र की तुलना करें।