Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रिस्क है तो इश्क है..,' एफडी नाही तर आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करताहेत भारतीय; काय म्हणतो रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:37 IST

भारतीयांची आता गुंतवणूकीची पद्धत बदलली आहे. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी आता भारतीय शेअर बाजाराकडे वळले आहेत.

२०२० मध्ये "स्कॅम १९९२" ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. हर्षद मेहताची भूमिका प्रतीक गांधी यानं साकारली होती. एके काळी शेअर बाजारात हर्षद मेहताचा बोलबाला होता. या वेब सिरीजमध्ये प्रतीक गांधी याचा एक डायलॉग आहे, "रिस्क है तो इश्क है," चर्चा करत असताना तो आपल्या भावाला हे म्हणतो. आता भारतीयांसोबतही असंच काहीसं घडत आहे. कारण त्यांच्या गुंतवणूक पद्धती बदलल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, ते आता शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करतात.

गेल्या दहा वर्षांत भारतीय कुटुंबांच्या बचतीच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. बँक एफडीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची जागा आता म्युच्युअल फंड व शेअर बाजारावर आधारित गुंतवणुकीनं घेतली आहे. घरगुती बचतीमध्ये इक्विटी-म्युच्युअल फंडांचा वाटा २०१२ मध्ये २% पेक्षा  कमी होता, जो आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १५% पेक्षा जास्त झाला आहे, जो जवळजवळ सात पट वाढला आहे. याउलट, याच कालावधीत बँक मुदत ठेवींचा वाटा ५८% वरून सुमारे ३५% पर्यंत घसरला आहे.

सिगारेटपासून ते FASTag पर्यंत, १ फेब्रुवारीपासून बदलणार 'या' वस्तूंच्या किंमती; खिशावर थेट होणार परिणाम

 

दरडोई उत्पन्न किती वाढलं?
वर्ष खर्चयोग्य उत्पन्ननिव्वळ उत्पन्न
२०२३-२४२,१९,३१२१,८८,८९२
२०२४-२५  २,३८,२७०२,०५,३२४
२०२५-२६२,५४,८४९२,१९,५७५

      ८४ लाख कोटींची गुंतवणूक भारतीयांनी शेअर बाजार व म्युच्युअल फंडांत केली.  

कोणती गुंतवणूक वाढली?
 २०१२२०२५
बँक डिपॉझिट५७.९%३५.२%
म्युच्युअल फंड१.८%१५.२%
English
हिंदी सारांश
Web Title : Risk is love: Indians invest more in stock market now.

Web Summary : Indians shift from fixed deposits to stock market, inspired by risk. Equity mutual funds surged from 2% to 15% since 2012, while bank deposits decreased significantly. ₹84 lakh crore invested in shares and mutual funds.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकम्युच्युअल फंड