Indian Rupee crashed : पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा आता भारतीय चलनाला होरपळून काढत आहे. सोमवारी, २३ मार्च रोजी भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ४१ पैशांची मोठी गटांगळी खात ९३.९४ हा ऐतिहासिक नीचांकी स्तर गाठला. इराण-इस्रायल संघर्षाने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतल्याने रुपयावर अभूतपूर्व दबाव निर्माण झाला आहे. यामुळे आता 'एक डॉलर = १०० रुपये' असे समीकरण होते की काय, अशी भीती अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
घसरणीची प्रमुख कारणे
- गेल्या काही दिवसांत रुपयाच्या मूल्यामध्ये झालेली घसरण ही जागतिक भू-राजकीय घडामोडींचा थेट परिणाम आहे.
- कच्चे तेल ११२ डॉलरवर : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पार गेल्या आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलात जवळपास ५०% वाढ झाली आहे.
- परदेशी गुंतवणूकदारांची पाठ : शेअर बाजारातील पडझडीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली आहे, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढली आणि रुपया कमकुवत झाला.
- विदेशी मुद्रा भांडारात घट : रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ७.०५२ अब्ज डॉलरची घट होऊन तो ७०९.७५९ अब्ज डॉलरवर आला आहे.
तुमच्या खिशावर होणारा परिणाम
- रुपया कमकुवत होणे म्हणजे सामान्य माणसासाठी महागाईचे नवे संकट येणे होय.
- काय महागणार? (आयात)
- भारताला आवश्यक असलेल्या कच्च्या तेलापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक गोष्टींसाठी आता जास्त डॉलर मोजावे लागतील.
- इंधन : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता.
- गॅजेट्स : मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होतील.
- परदेशातील शिक्षण : ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांना फी आणि राहण्याचा खर्च आता जास्त पडेल.
कोणाचा फायदा? (निर्यात)रुपया घसरल्याने भारतीय वस्तू जागतिक बाजारात स्वस्त होतात. यामुळे आयटी, टेक्सटाईल आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांची कमाई वाढू शकते. तसेच परदेशातून भारतात पैसे पाठवणाऱ्या भारतीयांना जास्त मोबदला मिळेल.
रुपया 'शंभरी' पार करणार का?बाजार अभ्यासकांच्या मते, जर इराण-अमेरिका संघर्ष प्रदीर्घ काळ चालला, तर डॉलर इंडेक्स आणखी मजबूत होईल. अशा स्थितीत रुपया प्रति डॉलर १०० च्या पातळीवर जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, रिझर्व्ह बँक आपल्या परकीय चलन साठ्याचा वापर करून बाजारात हस्तक्षेप करत आहे, जेणेकरून ही घसरण मर्यादित राखता येईल.
Web Summary : Rupee crashes to ₹93.94 against the dollar amid Mideast tensions and foreign investor exits. Rising crude oil prices fuel inflation fears, impacting fuel, electronics, and education costs. Experts fear ₹100 per dollar if conflict persists.
Web Summary : मध्य पूर्व तनाव और विदेशी निवेशकों के निकलने से रुपया डॉलर के मुकाबले ₹93.94 तक गिर गया। कच्चे तेल की बढ़ती कीमतें मुद्रास्फीति के डर को बढ़ा रही हैं, जिससे ईंधन, इलेक्ट्रॉनिक्स और शिक्षा लागत प्रभावित हो रही है। विशेषज्ञों को डर है कि अगर संघर्ष जारी रहा तो ₹100 प्रति डॉलर हो सकता है।