Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fortuner खरेदी करण्यासाठी किती असायला हवी तुमची सॅलरी? पाहा EMI चा हिशोब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:31 IST

Fortuner On EMI: भारतात जेव्हा एखादी गाडी लोकांच्या पसंतीस उतरते, तेव्हा ती फक्त एक वाहन न राहता एक ओळख बनून जाते. सध्या देशात महिंद्रा थार, महिंद्रा स्कॉर्पिओ-एन, टोयोटा फॉर्च्युनर आणि लँड रोव्हर डिफेंडर यांसारख्या गाड्यांची मोठी क्रेझ आहे.

Fortuner On EMI: भारतात जेव्हा एखादी गाडी लोकांच्या पसंतीस उतरते, तेव्हा ती फक्त एक वाहन न राहता एक ओळख बनून जाते. सध्या देशात महिंद्रा थार, महिंद्रा स्कॉर्पिओ-एन, टोयोटा फॉर्च्युनर आणि लँड रोव्हर डिफेंडर यांसारख्या गाड्यांची मोठी क्रेझ आहे. टोयोटा फॉर्च्युनर आता फक्त राजकारण्यांचीच नाही, तर उद्योजक आणि कलाकारांसह अनेक वर्गांची पसंती ठरत आहे. पण ही गाडी खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा आणि महिन्याला किती EMI भरावा लागेल, हे जाणून घेऊया.

टोयोटा फॉर्च्युनरची किंमत

भारतात टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ३४.१६ लाख रुपयांपासून सुरू होऊन ४९.५९ लाख रुपयांपर्यंत जाते. एक्स-शोरूम किमतीसोबतच तुम्हाला नोंदणी आणि विम्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. याशिवाय इतर चार्जेस मिळून या गाडीची ऑन-रोड किंमत ४० लाख ते ५९ लाख रुपयांपर्यंत पोहोचते.

रेखा झुनझुनवालांकडे आहेत ४ कोटींपेक्षा अधिक शेअर्स, 'टाटा'ची आहे कंपनी; ब्रोकरेज बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

आर्थिक स्थिती मजबूत असणे आवश्यक

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या कारची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५० टक्क्यांहून अधिक नसावी, जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती सुरक्षित राहील आणि गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही. याचाच अर्थ, जर तुम्हाला फॉर्च्युनरचे ५९ लाख रुपयांचे टॉप मॉडेल खरेदी करायचं असेल, तर तुमचं वार्षिक उत्पन्न किमान १.१८ कोटी रुपये असायला हवं.

EMI चं गणित

जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि ५८.८० लाख रुपयांचे टॉप मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला २० टक्के म्हणजेच ११.७६ लाख रुपये डाउन पेमेंट करावं लागेल. यानंतर उरलेल्या ४७.०४ लाख रुपयांच्या कर्जावर (८.५ टक्के व्याजदराने) ५ वर्षांसाठी तुम्हाला दरमहा सुमारे ९६,५०० रुपये EMI भरावा लागेल.

फॉर्च्युनर खरेदी करण्यासाठी किती पगार हवा?

आर्थिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या कारचा EMI हा तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्या २० टक्क्यांहून अधिक नसावा. जर तुमचा महिन्याचा EMI १ लाख रुपये असेल, तर तुमचा मासिक पगार किमान ५ लाख रुपये असायला हवा. केवळ EMI भरून चालत नाही, तर अशा महागड्या गाड्यांच्या देखभालीसाठी देखील वेळोवेळी मोठी रक्कम खर्च करावी लागते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fortuner Salary Check: EMI Calculations for Buying Your Dream Car

Web Summary : Dreaming of a Fortuner? Consider your salary! Experts advise that the car's cost shouldn't exceed 50% of your annual income. For a top model costing ₹58.80 lakhs, a ₹5 lakh monthly income is recommended, factoring in a ₹1 lakh EMI and maintenance.
टॅग्स :बँकपैसा