Join us
Daily Top 2Weekly Top 5

SBI मधून ₹१० लाखांचं Car Loan घेण्यासाठी किती असावी लागेल Salary, किती लागेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:02 IST

SBI Car Loan Salary: सरकारनं गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी नवीन जीएसटी (GST) दर लागू केला होता, ज्याअंतर्गत लहान कारवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागत आहे. गाड्यांवरील जीएसटी कमी झाल्यापासून विक्रीत मोठी वाढ दिसून आलीये.

SBI Car Loan Salary: सरकारनं गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी नवीन जीएसटी (GST) दर लागू केला होता, ज्याअंतर्गत लहान कारवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागत आहे. गाड्यांवरील जीएसटी कमी झाल्यापासून विक्रीत मोठी वाढ दिसून आलीये. नवीन कारवरील टॅक्सचा बोजा कमी झाल्यामुळे आता सामान्य लोकही आपल्या कुटुंबासाठी कार खरेदी करत आहेत. 

जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा आणि त्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला कार लोनशी संबंधित एक विशेष कॅल्क्युलेशन सांगणार आहोत. भारतीय स्टेट बँकेतून (SBI) ५ वर्षांसाठी १० लाख रुपयांचं कार लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा आणि दरमहा किती ईएमआय (EMI) भरावा लागेल, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

आधार–LPG गॅस कनेक्शन लिंक केलं नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान; आजच पूर्ण करा महत्त्वाचं काम, 'ही' आहे प्रोसेस

१० लाख रुपयांच्या कार लोनसाठी किती असावा पगार?

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सर्व बँकांनी कार लोनसह इतर सर्व कर्जे स्वस्त केली आहेत. भारतीय स्टेट बँक आता केवळ ८.७ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं कार लोन ऑफर करत आहे. एसबीआयकडून कार लोन घेण्यासाठी तुमचा वार्षिक पगार किमान ३ लाख रुपये म्हणजेच मासिक पगार किमान २५,००० रुपये असणं आवश्यक आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना त्यांच्या मासिक पगाराच्या ४८ पट कर्ज देते. समजा, तुमचा मासिक पगार २५,००० रुपये असेल तर तुम्हाला २५,०००x४८=१२,००,००० रुपयांपर्यंत कार लोन मिळू शकतं.

दरमहा किती भरावा लागेल ईएमआय?

एसबीआयकडून ८.७ टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी १० लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा सुमारे २०,६१३ रुपये ईएमआय भरावा लागेल. याशिवाय, जर तुम्ही हेच कर्ज फक्त ३ वर्षांसाठी घेतले तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे ३१,६६० रुपये असेल. भारतीय स्टेट बँक जास्तीत जास्त ७ वर्षांच्या कालावधीसाठी कार लोन देते. जर तुम्ही ७ वर्षांसाठी १० लाख रुपयांचं कार लोन घेतलं, तर तुम्हाला दरमहा १५,९३७ रुपये ईएमआय भरावा लागेल. लक्षात ठेवा की, तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी कर्ज घ्याल, तितकं जास्त व्याज तुम्हाला भरावं लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : SBI Car Loan: Salary Needed for ₹10 Lakhs & EMI Details

Web Summary : GST reduction boosted car sales. SBI offers car loans at 8.7% interest. A ₹10 lakh loan requires ₹25,000 monthly income. EMI for 5 years is ₹20,613.
टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाकार