Join us
Daily Top 2Weekly Top 5

SBI मधून ₹४० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी Salary; किती भरावा लागेल EMI? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 09:37 IST

SBI Home Loan: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली होती, ज्यामुळे होम लोन, कार लोनसह सर्व प्रकारची कर्जे स्वस्त झाली आहेत.

SBI Home Loan: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली होती, ज्यामुळे होम लोन, कार लोनसह सर्व प्रकारची कर्जे स्वस्त झाली आहेत. कर्ज स्वस्त झाल्याचा थेट फायदा सामान्य लोकांना मिळत आहे, कारण रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी झाले आणि परिणामी ईएमआय (EMI) देखील घटला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक - SBI आता अत्यंत आकर्षक व्याजदरांवर होम लोन देत आहे. भारतीय स्टेट बँक आता केवळ ७.२५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोन ऑफर करत आहे. ३० वर्षांसाठी ७.२५ टक्के व्याजदरानं ४० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी मासिक पगार किती असावा आणि दरमहा किती ईएमआय येईल, याची माहिती आपण येथे घेणार आहोत.

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,४७८ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन

४० लाखांचं होम लोन घेण्यासाठी किती असावा पगार?

भारतीय स्टेट बँकेचे होम लोनचे व्याजदर ७.२५ टक्क्यांपासून सुरू होत आहेत. ७.२५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी ४० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान ५५,००० रुपये असणं आवश्यक आहे. परंतु, यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, तुमच्या नावावर दुसरं कोणतेही कर्ज सक्रिय नसावं. SBI कडून ७.२५ टक्के व्याजदरानं ३० वर्षांसाठी ४० लाख रुपयांचं होम लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा सुमारे २७,५०० रुपये ईएमआय भरावा लागेल. होम लोनच्या बाबतीत तुमच्या पगाराचा साधारण अर्धा भाग कर्जाच्या ईएमआयमध्ये जातो.

होम लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोर असावा उत्तम

कोणत्याही बँकेकडून होम लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) उत्तम असणं आवश्यक आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल, तर बँका तुमचा कर्ज अर्ज फेटाळू शकतात. कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोर व्यतिरिक्त, बँक तुमच्या जुन्या कर्ज खात्यांची देखील तपासणी करते.

जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल, तर तुम्ही बँकेशी व्याजदरात सवलत मिळवण्यासाठी वाटाघाटी करू शकता. अनेकदा चांगल्या क्रेडिट स्कोरमुळे बँका व्याजदरात चांगली ऑफर देतात. म्हणूनच, होम लोन किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी फक्त एकाच बँकेत जाण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सर्वोत्तम ऑफरचा शोध घ्यायला हवा.

English
हिंदी सारांश
Web Title : SBI Home Loan: Salary needed for ₹40 lakh loan, EMI details.

Web Summary : SBI offers home loans at 7.25%. A ₹40 lakh loan for 30 years requires a ₹55,000 monthly income and a ₹27,500 EMI, assuming no other active loans. A good credit score is essential for loan approval and negotiating better rates.
टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूकपैसा