Join us

गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 06:00 IST

मार्च २०२४ मध्ये देशातील गृहकर्जाची एकूण थकबाकी २७,२२,७२० कोटी रुपये इतकी होती. त्याआधी मार्च २०२३ मध्ये ती १९,८८,५३२ कोटी रुपये होती. 

नवी दिल्ली : मागील २ वर्षांत गृहकर्जाची थकबाकी १० लाख कोटी रुपयांनी वाढून यंदाच्या मार्चमध्ये विक्रमी २७.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या ‘बँक कर्जाचे क्षेत्रनिहाय वितरण’ नावाच्या अहवालात म्हटले की, ‘कोविड साथीनंतर निवासी संपत्ती बाजारात सुप्त मागणी समोर आली. त्यामुळे गृहकर्जाची थकबाकीही वाढली आहे.’मार्च २०२४ मध्ये देशातील गृहकर्जाची एकूण थकबाकी २७,२२,७२० कोटी रुपये इतकी होती. त्याआधी मार्च २०२३ मध्ये ती १९,८८,५३२ कोटी रुपये होती. 

विक्री व किमतीत वाढविभिन्न संपत्ती सल्लागारांच्या अहवालानुसार, मागील २ वर्षांत घरांच्या विक्रीत आणि किमतींत उल्लेखनीय वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, गृहकर्जातील वृद्धी मजबूत राहील, असा अंदाज आहे. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजन