Home Loan : स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक नोकरदार पाहतो. विशेषतः जेव्हा तुमचा मासिक पगार ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान असतो, तेव्हा हे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे दिसू लागतात. मात्र, मार्च २०२६ च्या बदलत्या व्याजदरांच्या आणि बँकिंग नियमांच्या पार्श्वभूमीवर, १ लाख रुपये पगार असलेल्या व्यक्तीला बँक नेमके किती कर्ज देऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गृहकर्जाची पात्रता आणि 'ईएमआय'चे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
बँका कशा ठरवतात तुमची कर्ज पात्रता?गृहकर्ज मंजूर करताना बँका प्रामुख्याने FOIR (Fixed Obligation to Income Ratio) हा निकष लावतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या एकूण पगाराच्या ५०% ते ६०% पेक्षा जास्त रक्कम ईएमआयमध्ये जाऊ नये, याची काळजी बँक घेते. जेणेकरून उर्वरित पैशांतून तुमचा घरखर्च सुलभपणे चालू शकेल.
पगार १ लाख असल्यास: बँक असे गृहीत धरते की, तुम्ही दरमहा ५०,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत ईएमआय सहज भरू शकता.व्याजदर आणि कालावधी : सध्याच्या ८% सरासरी व्याजदरानुसार आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी हे गणित मांडले जाते.
१ लाख पगार असल्यास किती कर्ज मिळेल? (अंदाजित गणित)
| कर्जाची रक्कम | मासिक ईएमआय | सविस्तर विश्लेषण |
| ६० लाख रुपये | ५०,१८६ | १ लाख पगार असलेल्यांसाठी हा सर्वात 'सुरक्षित' कर्जाचा आकडा मानला जातो. |
| ७० लाख रुपये | ५८,५५१ | जर तुमचे दुसरे कोणतेही कर्ज (उदा. कार किंवा वैयक्तिक कर्ज) चालू नसेल, तर बँक इतके कर्ज सहज मंजूर करते. |
| ८० लाख रुपये | ६६,९१५ | जर तुमचा सिबिल स्कोर ८०० पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही नामवंत कंपनीत कामाला असाल, तर काही बँका ८० लाखांपर्यंतही कर्ज देतात. |
कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी ३ 'स्मार्ट' मार्ग
- जर तुम्हाला १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे घर घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमची कर्ज पात्रता खालील मार्गांनी वाढवू शकता:
- सह-अर्जदार : तुमच्या पत्नीला किंवा कमवत्या पालकांना कर्जात सामील करा. दोघांच्या एकत्रित उत्पन्नामुळे तुमची कर्जाची मर्यादा १.५ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.
- कर्जाचा कालावधी वाढवणे: कर्जाचा कालावधी २० वर्षांऐवजी ३० वर्षांपर्यंत केल्यास तुमचा मासिक ईएमआय कमी होतो. यामुळे बँक तुम्हाला अधिक मोठी रक्कम कर्ज म्हणून देऊ शकते.
- जुनी कर्जे बंद करा: गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट कार्डची थकबाकी किंवा छोटे वैयक्तिक कर्ज बंद करा. यामुळे बँकांच्या नजरेत तुमची हप्ते फेडण्याची क्षमता वाढलेली दिसते.
वाचा - एका आठवड्यात सोन्यात १३,७०० रुपयांची तर चांदीत ३२,००० रुपयांची घसरण, गुंतवणुकीची योग्य संधी?गृहकर्ज घेताना केवळ बँक किती कर्ज देतेय यापेक्षा, तुमच्या खिशाला किती ईएमआय परवडतोय याचा विचार करा. आदर्श परिस्थितीत, तुमच्या एकूण इन-हॅन्ड पगाराच्या ४०% पेक्षा जास्त ईएमआय नसावा, जेणेकरून मुलांचे शिक्षण, गुंतवणूक आणि आपत्कालीन खर्चासाठी तुमच्याकडे पुरेशी रक्कम शिल्लक राहील.
Web Summary : Dreaming of a home? Banks assess loan eligibility based on income and repayment capacity. A ₹1 lakh salary could secure a ₹60-80 lakh loan, considering interest and tenure. Boost eligibility by adding co-applicants or extending loan terms.
Web Summary : घर का सपना? बैंक आय और चुकौती क्षमता के आधार पर ऋण पात्रता का आकलन करते हैं। ₹1 लाख का वेतन ब्याज और अवधि को ध्यान में रखते हुए ₹60-80 लाख का ऋण सुरक्षित कर सकता है। सह-आवेदकों को जोड़कर या ऋण अवधि बढ़ाकर पात्रता बढ़ाएँ।