Join us

क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:34 IST

Credit Card Insurance : अनेक क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डसोबत विम्याचा लाभ देखील देतात. आज आपण अशाच काही क्रेडिट कार्डबाबत माहिती घेणार आहोत.

Credit Card Insurance : आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. खासकरून नोकरदार वर्ग क्रेडिट कार्डचा भरपूर वापर करत आहे. कारण क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर अनेक प्रकारचे डिस्काउंट, कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्ससारखे फायदे मिळतात, जे लोकांना आकर्षित करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डसोबत विम्याचा लाभही देतात. आज आपण क्रेडिट कार्डसोबत मिळणाऱ्या या विम्यांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

क्रेडिट कार्डसोबत मिळणारे विम्याचे फायदेअनेक कंपन्या आपल्या क्रेडिट कार्डसोबत ग्राहकांना विम्याचा लाभ देतात आणि विशेष गोष्ट म्हणजे हा विमा ग्राहकाला कोणताही अतिरिक्त प्रीमियम न भरता मिळतो. यामध्ये खालील प्रकारचे विमा संरक्षण समाविष्ट असते.

  1. अपघात विमा: अपघातामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
  2. प्रवास विमा : प्रवासादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाते. यामध्ये सामान हरवणे किंवा फ्लाइट रद्द होणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.
  3. बेरोजगारी विमा : जर क्रेडिट कार्डधारकाची नोकरी गेली, तर त्याला क्रेडिट कार्डचे किमान पेमेंट भरण्याची गरज नसते.
  4. अपंगत्व विमा : जर कार्डधारकाला अपंगत्व आलं तर त्याला किमान पेमेंट भरण्याची आवश्यकता नसते.
  5. फसवणुकीच्या व्यवहारांचे संरक्षण : क्रेडिट कार्डचा वापर करून झालेल्या फसवणुकीच्या व्यवहारांपासून संरक्षण मिळते.
  6. खरेदी संरक्षण विमा : क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंचे संरक्षण केले जाते, जसे की चोरी किंवा नुकसानीच्या बाबतीत.

क्रेडिट कार्डसोबत जीवन विमाक्रेडिट कार्डसोबत मिळणारा जीवन विमा अशा परिस्थितीत उपयोगी पडतो, जेव्हा क्रेडिट कार्डधारकाचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचे थकित बिल कंपनी स्वतःच भरते, ज्यामुळे कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही.

वाचा - रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा

विम्यासाठी ही क्रेडिट कार्ड्स वापराक्रेडिट कार्डसोबत विमा मिळवण्यासाठी तुम्ही काही खास क्रेडिट कार्ड्स वापरू शकता. यामध्ये एचडीएफसी बँक रेगुलिया कार्ड, अॅक्सिस बँक प्रिविलेज कार्ड, कोटक रॉयल सिग्नेचर कार्ड, इंडसइंड ऑरा कार्ड, आयसीआयसीआय बँक रुबिक्स आणि पीएनबी ईएमटी रुपे प्लॅटिनम यांसारख्या कार्ड्सचा समावेश आहे. त्यामुळे, क्रेडिट कार्ड निवडताना हे अतिरिक्त फायदे नक्की विचारात घ्या.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा