ATM Charges : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तीन मोठ्या बँकांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. आज, १ एप्रिलपासून एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही विचार न करता वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल, तर आता तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. विशेष म्हणजे, आता 'यूपीआय'द्वारे एटीएममधून काढलेले पैसेही तुमच्या फ्री लिमिटमध्ये मोजले जाणार आहेत.
'UPI-ATM' व्यवहारांबाबत मोठा बदलआतापर्यंत अनेक ग्राहक एटीएम कार्ड ऐवजी यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढण्यास पसंती देत होते. मात्र, आता हा व्यवहारही तुमच्या महिन्याच्या ५ मोफत व्यवहारांच्या मर्यादेत गणला जाईल. एकदा का ही मर्यादा संपली की, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये अधिक टॅक्स असा भुर्दंड सोसावा लागेल.
'या' बँकांनी बदलले नियम; तुमची बँक यात आहे का?१. एचडीएफसी बँकएचडीएफसी बँकेने स्पष्ट केले आहे की, १ एप्रिलपासून यूपीआय आणि सामान्य एटीएम काढणे एकाच मर्यादेत येईल. ५ मोफत व्यवहार संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त ट्रान्झॅक्शनसाठी २३ रुपये (अधिक कर) मोजावे लागतील.
२. पंजाब नॅशनल बँकपीएनबीने आपल्या विविध डेबिट कार्ड्सची 'कॅश विड्रॉल लिमिट' निम्म्यावर आणली आहे.क्लासिक कार्ड: मर्यादा १,००,००० रुपयांवरून ५०,००० रुपयांवर आली आहे.प्रीमियम कार्ड: मर्यादा १,५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपयांवर करण्यात आली आहे.३. बंधन बँकबंधन बँकेच्या ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर ५ मोफत आर्थिक व्यवहार मिळतील, तर 'बॅलन्स चेक' सारखे बिन-आर्थिक व्यवहार अमर्याद असतील. मात्र, दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर मेट्रो शहरात ३ आणि नॉन-मेट्रो शहरात ५ मोफत व्यवहारांची मर्यादा असेल, ज्यात आर्थिक आणि बिन-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश असेल.
वाचा - नोकरकपातीला 'AI' जबाबदार की कंपन्यांचा आर्थिक हावरेपणा? ओरेकलमधील कपातीचे खरे वास्तव वेगळंच!
२३ रुपयांचा अतिरिक्त चार्ज कसा वाचवाल?१. रोख रकमेचे नियोजन करा: वारंवार लहान रकमा काढण्याऐवजी, महिन्याभराच्या गरजेनुसार एकदाच मोठी रक्कम काढा. यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन कमी होतील आणि फ्री लिमिट लवकर संपणार नाही.२. स्वतःच्या बँकेचे एटीएम वापरा: शक्यतो आपल्याच बँकेच्या एटीएमचा वापर करा, कारण तेथे मोफत व्यवहारांची संख्या जास्त असते. दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरल्यास तुमची मर्यादा लवकर संपते.३. डिजिटल व्यवहारांना पसंती द्या: छोट्या खर्चांसाठी रोख रकमेऐवजी यूपीआय किंवा डेबिट कार्डने थेट पेमेंट करा. तसेच, शिल्लक तपासण्यासाठी एटीएमवर जाण्याऐवजी मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करा.
Web Summary : ATM withdrawals are now pricier with new rules effective April 1st. HDFC, PNB, and Bandhan Bank changed ATM charges. UPI ATM transactions now count towards free limit. Avoid charges by planning cash needs and using own bank ATMs.
Web Summary : एटीएम से पैसे निकालना महंगा हुआ; 1 अप्रैल से नए नियम लागू। एचडीएफसी, पीएनबी और बंधन बैंक ने एटीएम शुल्क बदले। यूपीआई एटीएम लेनदेन अब मुफ्त सीमा में गिने जाएंगे। नकदी की योजना बनाकर और अपने बैंक के एटीएम का उपयोग करके शुल्क से बचें।